दयाबेन यांच्या कॅन्सर प्रकरणावर जेठालाल यांची प्रतिक्रिया; ‘म्हणाले सकाळ पासून…’

दिल्ली | तारक मेहता का उलटा चष्मा मधील प्रसिध्द अभिनेत्री दिशा वकानी यांना घशाचा कॅन्सर झाल्याची माहिती सोशल मीडिया वर वाऱ्या सारखी पसरली आहे. त्यामुळे दयाबेन यांचे चाहते चांगलेच चिंतेत पडले आहेत. दिशा यांचे करोडो चाहते आहेत. त्या चाहत्यांसाठी तारक मेहता का उलटा चष्मा मधील जेठालाल यांनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे.

Join WhatsApp Group

 

2019 साली दयाबेन यांनी मलिकेमधून ब्रेक घेतला आहे. त्यांनी त्यावेळी प्रसूती साठी ब्रेक घेतला होता. मात्र त्यांनी त्यांनी परत मालिकेत काम केले नाही. मालिका संचालक मंडळांनी त्यांना परत आणण्यासाठी अनेक प्रयत्न केले मात्र दिशा यांनी नकार दिला होता. त्या कायम कोणत्या न कोणत्या कारणांमुळे चर्चेत येऊ लागल्या आहेत.

 

सध्या त्यांची प्रकृति बिघडली असल्याची बातमी सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. या बातमी बाबत तारक मेहता का उलटा चष्मा मधील जेठालाल हे पात्र साकारणारे अभिनेते दिलीप जोशी यांनी सकारात्मक वक्तव्य केले आहे. त्यामुळे चाहत्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.

 

दिलीप जोशी म्हणाले की “सकाळ पासून मला दयाबेन यांच्या प्रकृती बाबत अनेक फोन येत आहेत. आणि सध्या अशा अनेक अफवा पसरविल्या जात आहेत. दिशा या एकदम ठणठणीत आहेत. त्यांच्या या प्रकृतीच्या बातमी बाबत निव्वळ अफवा पसरविल्या जात आहेत.” असे दिलीप यांनी बोलताना सांगितले आहे. मात्र याबाबत दयाबेन यांच्या किँवा नातेवाईकांकडून कोणतेही स्टेटमेंट नाही.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button