जसप्रीत बुमराहला आशिया चषक स्पर्धेतून वगळले, खरे कारण आले समोर

दिल्ली | आशियायी चषक २०२२ स्पर्धेसाठी काल बीसीसीआयने आपल्या संघातील सर्व स्पर्धकांची नवे जाहीर केली. गेल्या अनेक दिवसांपासून विराट कोहली यात खेळणार की नाही यावर चर्चा सुरू होती. तसेच लोकेश राहुल हा देखील या सामन्यात खेळणार की नाही या बाबत देखील संभ्रम होता. अशात जाहीर झालेल्या संघाच्या यादीत विराटचे नाव आहे. मात्र लोकेशचे नाव यातून वगळण्यात आले आहे.

 

त्यामुळे अनेक जण चकित झाले आहेत. यासह जसप्रीत बुमराह याचे नाव देखील यंदाच्या संघातून वगळले गेले आहे. त्यामुळे अनेकांना धक्का बसला आहे. नुकतेच याचे असे कारण समोर आले आहे की, जसप्रीतच्या पाठीला दुखापत झाली आहे. त्यामुळे त्याला विश्रांती दिली गेली आहे.

 

बीसीसीआयने यावर आपले स्पष्टीकरण दिलेले नाही. मात्र त्यांच्या सूत्रांनी असे सांगितले होते की, ” जसप्रीत बुमराह याच्या पाठीला दुखापत झाली आहे. त्यामुळे आशिया चषक स्पर्धेत भाग घेऊ शकत नाही. तो भारताचा एक उत्तम खेळाडू आहे. तसेच आगामी २०-२० स्पर्धेत त्याला खेळता यावे म्हणून त्याला आता विश्रांती दिली आहे. त्याला दुखापत झालेल्या अवस्थेत खेळवले आम्हाला योग्य वाटत नाही.” असे त्यांनी सांगितले.

 

बुमराह हा इंग्लंड दौऱ्यावर वन डे मालिका खेळला होता. सध्या तो विश्रांती घेत असून आपल्या कुटंबियांसमवेत वेळ घालवत आहे. लवकरच तो बंगळुरू येथील राष्ट्रीय क्रिकेट अकादमी येथे उपचार घेण्यासाठी दाखल होणार आहे. तो जोपर्यंत पूर्ण ठीक होत नाही तोपर्यंत त्याला कोणताही सामना खेळता येणार नाही.

आशिया चषक स्पर्धेचे संपूर्ण वेळापत्रक पुढील प्रमाणे…

दि. २७ ऑगस्ट – श्रीलंका विरुद्ध अफगाणिस्तान
ठिकाण – दुबई
वेळ – सायंकाळी ७.३० वाजल्यापसून

दि. २८ ऑगस्ट- भारत विरुद्ध पाकिस्तान

दि. ३० ऑगस्ट – बांगलादेश विरुद्ध अफगाणिस्तान,
ठिकाण – शाहजाह
वेळ – सायंकाळी ७.३० वाजल्यापसून

दि. ३१ ऑगस्ट – भारत विरुद्ध क्वालिफायर
ठिकाण – दुबई
वेळ – सायंकाळी ७.३० वाजल्यापसून

दि. १ सप्टेंबर – श्रीलंका विरुद्ध बांगलादेश
ठिकाण – दुबई
वेळ – सायंकाळी ७.३० वाजल्यापसून

दि.२ सप्टेंबर – पाकिस्तान विरुद्ध क्वालिफायर
ठिकाण – शाहजाह
वेळ – सायंकाळी ७.३० वाजल्यापसून

दि. ३ सप्टेंबर – B1 विरुद्ध B2, Super 4
ठिकाण – शाहजाह
वेळ – सायंकाळी ७.३० वाजल्यापसून

दि – ४ सप्टेंबर – A1 विरुद्ध A2, Super 4
ठिकाण – दुबई
वेळ सायंकाळी ७.३० वाजल्यापसून

दि. ६ सप्टेंबर – A1 विरुद्ध B1, Super 4
ठिकाण – दुबई
वेळ – सायंकाळी ७.३० वाजल्यापसून

दि. ७ सप्टेंबर – A2 विरुद्ध B2, Super 4
ठिकाण – दुबई
वेळ – सायंकाळी ७.३० वाजल्यापसून

दि. ८ सप्टेंबर- A1 विरुद्ध B2, Super 4
ठिकाण – दुबई
वेळ – सायंकाळी ७.३० वाजल्यापसून

दि. ९ सप्टेंबर – B1 विरुद्ध A2, Super 4
ठिकाण – दुबई
वेळ – सायंकाळी ७.३० वाजल्यापसून

दि. ११ सप्टेंबर – अंतिम सामना ठिकाण – दुबई
वेळ – सायंकाळी ७.३० वाजल्यापसून

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button