जब्या टाकणार शालुवर काळ्या चिमणीची राख… पुन्हा दिसणार या चित्रपटात दोघेही एकत्र…

मुंबई | 2014 साली प्रदर्शित झालेल्या फँड्री चित्रपटातून सोमनाथ ‘जब्या’च्या तर राजेश्वरी ‘शालू’च्या भूमिकेतून ही जोडी घराघरात पोहोचली होती. जब्या आणि शालूची भूमिका अतिशय तंतोतंत जुळून आल्यानंतर सोमनाथ आणि राजश्री यांची आजही चर्चा होतेय. त्यामुळेच ही जोडी सध्या काय करते? अशा चर्चा सुरूये.

Join WhatsApp Group

 

नुकतंच दोघांनी सोबत एक व्हिडिओ शेअर केला. या व्हिडिओमध्ये जब्या आणि शालू पुन्हा एकदा एकत्र दिसले आहेत. अभिनेत्री राजेश्वरी खरात सोशल मीडियावर चांगलीच सक्रिय असते. आपल्या आगामी प्रोजेक्ट बद्दल देखील माहिती देत, ती पोस्ट शेअर करताना दिसते.

 

अभिनेता सोमनाथ आणि अभिनेत्री राजेश्वरी दिसतायत एकच व्हिडिओत एकत्र… :
मात्र नुकतच तिने सोमनाथ सोबत एक खास विडियो शेअर केला आहे. त्यामुळे सध्या या व्हिडियोची चर्चा रंगली आहे. ‘आज कल तेरे मेरे प्यार के चर्चे,’ या गाण्यावर दोघांनी मिळून एक विडियो बनवला आहे. हा व्हिडियो सगळीकडे चर्चेचा विषय ठरला आहे. व्हिडिओमध्ये दोघांनीही कमालीचे हाव भाव दिले आहेत.

लवकरच मोठ्या पडद्यावर:
युजर्सने देखील या व्हिडिओ वरती भन्नाट प्रतिक्रिया दिल्या आहेत. दरम्यान अलीकडेच आलेल्या बातम्यानुसार लवकरच सोमनाथ आणि राजेश्वरी मोठ्या पडद्यावर पुन्हा एकदा झळकणार असल्याचे बोलले जात आहे.

परंतु अजूनही चित्रपटाचे नाव जाहीर करण्यात आलेलं नाहीये. लवकरच या चित्रपटाच्या निमित्ताने सोमनाथ आणि राजेश्वरी यांची जोडी पुन्हा एकदा प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button