या अभिनेत्याला चित्रपटात घेणे दिग्दर्शकाला पडले महागात; प्रसिध्द दिग्दर्शकाचे हृदयद्रावक निधन

दिल्ली | साल 2020 मध्ये रिलीज झालेल्या अनुराग बासूच्या ‘लुडो’ चित्रपटात वापरलेले ‘ओ बेटा जी’ हे गाणं लोकांमध्ये खूप लोकप्रिय झालं. हे गाणं ऐकल्यानंतर लोकांनी यूट्यूबवर त्याचं मूळ व्हर्जन शोधण्यास सुरुवात केली. तेव्हा प्रेक्षकांना समजले, की हे ‘अलबेला’ चित्रपटाचं गाणं आहे ज्यात भगवान दादा नावाच्या अभिनेत्याने मुख्य भूमिका केली आहे. आज या बातमीतून याच भगवान दादा बद्दला आणी त्यांच्या हृदयद्रावक निधना बद्दल जाणून घेऊ.
त्यांचं भोली सुरत दील के खोटे हे गाणं खूप गाजलं होतं. भगवान दादा हे त्यांच्या काळातील एक मोठे स्टार होते. भगवान दादांचे खरे नाव भगवान आबाजी पालव असे होते. चित्रपटांमध्ये येण्यापूर्वी त्यांना अनेक वाईट टप्प्यातून जावे लागले होते. त्यांचे वडील तेव्हा एक गिरणी कामगार होते. मात्र वडिलांची नोकरी गेल्याने घर चालवण्यासाठी त्यांना मजूर म्हणून काम करावे लागले. मात्र एक काळ असा आला ज्यात त्यांचे दारिद्र्य संपून गेले.
बॉलीवुडमध्ये त्यांनी दिग्दर्शक म्हणून कामाला सुरुवात केली. त्यानंतर त्यांनी अनेक आपल्या कुटुंबाच्या मदतीने अनेक सुपरहिट चित्रपट बनवले. साल १९३८ मध्ये बाहदुर किसान हा त्यांनी दिग्दर्शित केलेल्या पहिला चित्रपट प्रदर्शित झाला. त्यानंतर 1938 ते 1949 चा काळ हा त्यांच्यासाठी खूप चांगला काळ ठरला. या काळामध्ये त्यांनी अनेक कौटुंबिक आणि ॲक्शन चित्रपट बनवले.
एका उत्तम दिग्दर्शकाप्रमाणेच ते उत्तम अभिनेते देखील होते. त्यांच्या कारकीर्दीत त्यांनी अनेक चित्रपटांमध्ये अभिनय देखील केला आहे. कामामधून मिळत असलेली प्रसिद्धी आणि पैसा या सर्वांमुळे त्यांची श्रीमंती खूप वाढली होती. त्यांच्याकडे वेगवेगळ्या ब्रँडच्या सात महागड्या गाड्या होत्या. तसेच 25 खुल्या असलेला आलिशान बंगला देखील होता. मात्र या सर्व गोष्टी सोडून त्यांचा मृत्यू एका चाळीतल्या घरामध्ये झाला.
त्यांच्या ‘हसते रहाना’ या चित्रपटासाठी मुख्य अभिनेता म्हणून किशोर कुमारची निवड करण्यात आली होती. या चित्रपटात किशोर कुमारला साईन करणे ही त्यांच्या आयुष्यातील सर्वात मोठी चूक होती असे मानले जाते. कारण हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर पूर्णतः फ्लॉप ठरला. या चित्रपटामुळे भगवानदादा खूप कर्जबाजारी झाले. या चित्रपटासाठी त्यांनी आपली सर्व संपत्ती पणाला लावली होती. मात्र या चित्रपटातून ते इन्वेस्ट केलेल्या रकमेपैकी अर्धी रक्कम देखील कमवू शकले नाही. त्यामुळे सर्व विकून त्यांच्यावर खूप दारिद्र्य आले.
तसेच त्यांनी चाळीमध्ये एक घर घेतले. जवळ असलेली प्रसिद्धी पैसा संपत्ती हे सर्व काही एका चित्रपटामुळे नष्ट झालं यामुळे ते नेहमीच चिंतेत होते. तसेच चाळीमध्ये राहत असताना ते डिप्रेशनमध्ये देखील गेले होते. यातच त्यांना हृदयविकाराचा तीव्र झटका आला. आणि त्यांनी या जगाचा निरोप घेतला.