सलमान खानच्या गॅलेक्सी अपार्टमेंटच्या अडगळीत सापडल्या डेंग्यूच्या आळ्या…

मुंबई | बॉलिवूड अभिनेता भाईजान म्हणजेच सलमान खानला काही दिवसापूर्वी डेंग्यू झाला होता. तो बिग बॉस सीजन 16 या शोचं होस्टिंग करत होता. यामुळे या शोचं गेल्या काही दिवसांपूर्वी होस्टिंग बॉलिवूड दिग्दर्शक करण जोहर करत होता. सलमानच्या वांद्रे येथील गॅलेक्सी अपार्टमेंटच्या अडगळीत डेंग्यूच्या आळ्या सापडल्या होत्या. मात्र किटक नाशक विभागाच्या पथकाने सुरक्षिततेच्या दृष्टीने सदर ठिकाणी कीटकनाशक औषधांची फवारणी केली आहे.
ही माहिती किटक नाशक विभागाचे प्रमुख अधिकारी राजेंद्र नारींगरेकर यांच्याकडून देण्यात आली आहे. सलमान खान यांना डेंग्यूची लागण झाल्याची चर्चा कानावर आल्यानंतर पालिकेच्या कीटकनाशक पथकाने त्यांच्या वांद्रे येथील गॅलक्सी अपार्टमेंटमध्ये व परिसरात अशा 308 ठिकाणी भेट देऊन पाहणी केली. त्यावेळी सलमानच्या गॅलक्सी अपार्टमेंटमध्ये अडगळीच्या दोन ठिकाणी डेंग्यूच्या अळ्या आढळून आल्या.
डेंग्यू पसरविणा-या ‘एडिस इजिप्ती’ या डासांच्या आळ्यांची पैदास मुख्यत्वे स्वच्छ पाण्यात होत असते. यामुळे सलमानच्या अपार्टमेंटमध्ये त्या आळ्या तयार झालाय असल्याचं समजतंय. पालिकेच्या कीटकनाशके विभागाच्या पथकाने सदर परिसरात धुराचीफवारणी व कीटकनाशके फवारणीही केली आहे.
सलमान खानचे पुढील सिनेमे:
गॉडफादर, टायगर 3, तसेच शाहरुख खानच्या पठाण या सिनेमातही तो दिसणार आहे.