आत्ताच्या घडामोडी

‘हा’ क्रिकेटर देतोय मृत्यूशी अखेरची झुंज; प्रकृती गंभीर झाल्याने रूग्णालयात दाखल

दिल्ली | गेल्या काही दिवसापासून क्रिकेट विश्वातील अनेक खेळाडूंना गंभीर स्वरूपाच्या जखमा होत आहेत. तसेच काही जणांनी तर जगाचा निरोप घेतला आहे. ऑस्ट्रेलिया देशाचा दिग्गज बॉलर शेन वॉर्न याने देखील जगाचा निरोप घेतला.

 

त्याच्या निधनाची बातमी ताजी असताना आणखी एक दिग्गज खेळाडू मृत्यूशी झुंज देत असल्याची माहिती समोर आली आहे. तो खेळाडू एका गंभीर आजाराचा शिकार आहे. त्याची प्रकृती बिघडल्याने त्याला रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

 

इंग्लंड देशाचा माजी दिग्गज खेळाडू ग्राहम थोर्प सध्या मृत्यूशी झुंज देत आहेत. त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती समोर येत आहे. त्यामुळे क्रिकेट विश्वात चिंतेचे वातावरण पसरले आहे. ग्राहम यांनी ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड संघासाठी कोचिंग देखील केली आहे.

 

त्यांनी 100हून अधिक कसोटी सामने खेळले आहेत. तसेच त्यांनी एकदिवसीय सामन्यात 16हून अधिक शतके ठोकली आहेत. सध्या त्यांच्या प्रकृती बाबत अनेकजण विचारणा करत आहेत. त्यांना नेमका कोणता आजार झाला आहे.

 

हे समजू शकले नाही. मात्र त्यांची प्रकृती गंभीर असल्याची माहिती समोर आली आहे. 2005 रोजी ग्राहम यांनी क्रिकेट विश्वातील राजीनामा दिला आहे. त्यानंतर त्यांनी कोचिंग क्षेत्रांत चांगलंच नशीब आजमावले होते. भारतीय खेळाडूंमध्ये देखील यासंधर्भात चिंता व्यक्त केली जात आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button