आत्ताच्या घडामोडी

इंदुरिकर महाराजांची पत्नी पाहिलीत का? करतात ‘हे’ काम

अहमदनगर | ज्यांच कीर्तन ऐकून लाखो लोकांचे जीवन बदलून गेलं आहे. असे समाज प्रबोधनकार निवृत्ती काशिनाथ देशमुख म्हणजेच इंदुरीकर महाराज तुम्हाला माहीत असतीलच, त्यांचे कीर्तन ऐकण्यासाठी हजारो लोकांची मोठी गर्दी असते.

 

सांगितले जाते की, इंदुरिकर महाराजांचे कीर्तन घ्यायचे असेल तर त्यासाठी 3 महिने आधी बुकिंग करावे लागते. ते विनोदी कीर्तनातून समाज प्रबोधन करतात, त्यांच्यामुळे हजारो लोकांचे जीवन बदलून गेलं आहे.

 

 

दारू सोडण्यासाठी आणि नवरा बायको मधील भांडणासाठी त्यांचे अनेक कीर्तन लोकप्रिय आहेत. निवृत्ती महाराज आपल्या एका दिवसाच्या कीर्तनासाठी हजारो रुपये मानधन घेतात. त्यांचे लाखोंच्या संख्येत चाहते आहेत.

 

त्यांच्या खासगी आयुष्यातील अनेक गोष्टी फार कमी लोकांना माहीत आहेत. आज आम्ही त्यांच्या खासगी कौटुंबिक गोष्टींबाबत माहिती सांगणार आहे. महाराजांच्या विषयी जाणून घेण्यासाठी अनेकांची उत्सुकता असते.

 

इंदूरिकर महाराज यांच्या पत्नीचे नाव शालिनीताई आहे. शालिनीताई आणि निवृत्ती महाराज यांना दोन अपत्य आहेत. शालिनीताई या एक कीर्तनकार आहेत. त्या देखील आपल्या कीर्तनातून समाज प्रबोधन करतात.

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button