भारतीय संघ वर्ल्डकप मधून बाहेर; तरीही खेळाडुंना मिळाले करोडो रुपये, वाचा कोणाला मिळाले किती मानधन?

ॲडलेड | भारत विरुद्ध इंग्लंड या T 20 विश्वचषकात भारतीय संघाला पराभव पत्करावा लागला आहे. यामुळे भारतीय संघाचं मोठ नुकसान झालं आहे. इंग्लंडने 169 धावांच लक्ष एकही फलंदाज बाद न होता पार केलं आहे. आणि थेट हा संघ पराभवाच्या गर्तेत सापडला. अस असल तरीही भारतीय संघाला कोट्यवधीचे बक्षीस मिळाले आहे.
भारतीय संघाला किती रक्कम मिळाली – ॲडलेडच्या मैदानावर भारतीय चाहत्यांच्या मनावर स्वप्नांचा चक्काचूर झाला. भारत विरुद्ध पाकिस्तान ह्या दोन्ही संघात अंतिम सामना होईल. अशा चाहत्यांच्या अपेक्षा होत्या. परंतु झाल भलतचं भारतीय संघानी चाहत्यांचं मन नाराज केलं आहे.
अस असल तरी यंदाच्या स्पर्धेत भारतीय संघ मालामाल झाल्याचं समजतंय. यंदाच्या वर्षी आयसीसीने 46 कोटी एवढा खर्च केल्याचं सांगितलं जातंय. यात भारतीय संघान सेमी फायनल पर्यंतच यश संपादन केलं. त्यानंतर भारतीय संघ असफल ठरला. अशावेळी या संघाला 3 कोटी 27 लाख रुपये एवढं बक्षीस देण्यात येणार आहे. त्यामुळे भारतीय संघ मालामाल झाला आहे.
फायनल विजेत्या संघाला मिळणार एवढी रक्कम – फायनल विजेत्या संघाला आता किती रक्कम मिळणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. तेच रक्कम बक्षीस स्वरुपी कोण घेणार आहे हे पाहणे उत्सुकतेच ठरेल. यासाठी जवळ जवळ 13 कोटी एवढी रक्कम बक्षीस स्वरुपी देण्यात येईल अस देखील सांगण्यात आलं आहे. इंग्लंड आणि पाकिस्तान या दोघांमध्ये होत असलेल्या चुरशीच्या सामन्यात कोण बाजी मारेल हे पाहण्याची देखील उत्सुकता लागली आहे.