---Advertisement---

Railway Bharati 2026: दहावी पास उमेदवारांना रेल्वेमध्ये नोकरीची संधी; तब्बल ५३०० पदांसाठी मेगा भरती

दहावी पास उमेदवारांना रेल्वेमध्ये नोकरीची संधी; तब्बल ५३०० पदांसाठी मेगा भरती

February 19, 2026 5:26 PM
---Advertisement---

Railway Bharati 2026 | दहावी पास उमेदवारांसाठी केंद्राच्या रेल्वे विभागात काम करण्याची संधी मिळणार आहे. तब्बल ५३४९ पदांसाठी ही भरती प्रक्रिया राबविली जाणार आहे. त्यामुळे फक्त दहावी पास झालेल्या उमेदवरांना मोठी संधी उपलब्ध झाली आहे. दहावीत फक्त ५० टक्के गुणांहून अधिक गुण घेऊन पास झालेले सर्व विद्यार्थी या भरतीमध्ये सहभागी होऊ शकतात.

गुजरात, महाराष्ट्र, राजस्थान, मध्य प्रदेश या राज्यात नोकरी करावी लागणार आहे. या नोकर भरतीसाठी शासनाने अर्ज मागविले आहेत. अनेक दिवस नोकर भरतीची प्रतिक्षा करणाऱ्या उमदेवराना केंद्र शासनाने मोठी संधी उपलब्ध करून दिली आहे. केंद्र सरकारने व रेल्वे मंत्रालयाने RRC/WR/04/2025 या जाहिरात क्रमांकाने जाहिरात प्रसारित केली आहे.

  • पदाचे नाव (post name) – अप्रेंटिस
  • मंजूर केलेल्या जागा – ५३४९ (पाच हजार तीनशे एकोन पन्नास)
  • प्रकाशित केलेला जाहिरात क्रमांक – RRC/WR/04/2025
  • शैक्षणिक पात्रता – १० वी (५०% गुण घेऊन पास झालेले)
  • वयो – मर्यादा – २३/०३/२०२६ रोजी १५ ते २४ मधील उमेदवार, ST – SC – ५ वर्ष सूट तर OBC साठी ३ वर्ष सूट दिलेली आहे.
  • अर्ज रक्कम – जनरल आणि OBC साठी १०० रुपये तर इतरांसाठी ०० रुपये अर्ज रक्कम देण्यात आली आहे.
  • परीक्षा तारीख – अर्ज केल्यानंतर परीक्षा तारीख नंतर कळवली जाईल.
  • अर्ज सुरू झालेली तारीख – २१/फेब/२०२६
  • अर्ज करण्याची अंतिम तारीख – २३/मार्च/२०२६ रात्री ५ पर्यंत.

 Important Links

  • मूळ जाहिरात – View
  • अर्ज करा – APPLY
  • Depart Website – View

Ganesh Chavan

Is An Experienced Writer. He Has Previously Worked In Leading Newspapers, Pudhari, Loksatta

Subscribe YouTube

Subscribe

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment