भारतीय खेळाडूंचा ऑस्ट्रेलियात हिसकवला जातोय घास; बिसीसीआयने आयसीसीकडे केली तक्रार…

मेलबर्न| मेलबर्नमध्ये पाकिस्तानच्या तोंडातून विजयाचा घास हिसकावणाऱ्या भारतीय संघाला सीडनीत चांगले जेवण दिले गेले नसल्याचा प्रकार घडला आहे. मंगळवारी प्रॅक्टिस संपल्यानंतर जेवणाच्या मेन्यूवरून भारतीय खेळाडू नाराज झाले, त्यांनी ते माघारी पाठविले. याची तक्रार बीसीसीआयने आयसीसीकडे केल्याचे समजते आहे.

Join WhatsApp Group

 

ऑस्ट्रेलियात भारत हा संघ T 20 विश्वचषक खेळण्यासाठी सज्ज झाला असून पहिला पाकिस्तान विरूध्दच्या सामन्यात भारतानं विजयी मिळवला. एवढच नाही तर सुरुवातीला प्रॅक्टिस सेशन झाल आणि या प्रॅक्टिस सेशननंतर खेळाडूला ठरलेला आहार देण्यात आला. इतर संघातील खेळाडूंना गरम जेवण दिलं जात. परंतु भारतीय क्रिकेट संघाला गरम जेवण दिलं नाही अशी तक्रार बीसीसीआयने आयसीसीकडे केली.

 

काय होते जेवणात.. :
मेन्यूमध्ये प्रॅक्टिसच्या जेवणासाठी फळे आणि कस्टम सँडविच देण्यात आला होता. दुपारच्या जेवणाची वेळ असल्याने भारतीय खेळाडू परिपूर्ण जेवणाची अपेक्षा ठेवून होते. परंतू, ताटात फळे आणि सँडविच दिसल्याने खेळाडूंचा मूड ऑफ झाला. बीसीसीआयच्या अधिकाऱ्याने सांगितले की, हा कोणताही बहिष्कार वगैरे नव्हता. काही खेळाडूंनी फळे घेतली. मात्र, प्रत्येकाला दुपारचे जेवण करायचे होते. यामुळे ते हॉटेलला परतले आणि जेवले.

 

 

सरावासाठी भारताला सिडनीचे उपनगर दिले होते. टीम इंडियाच्या हॉटेलपासून 42 किलोमीटर अंतरावर होते. टीम इंडियाला दिलेले जेवण चांगले नव्हते. नुसतेच थंड सँडविच दिले होते. अस बिसीसीआयने आयसीसीकडे सांगीतले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button