आत्ताच्या घडामोडी

बॉलिवूडला पुन्हा धक्का! प्रसिध्द कलाकाराचे वयाच्या 57व्या वर्षी निधन; देशावर शोककळा

मुंबई | गेल्या वर्षभरापासून भारतीय कला विश्वाला धक्क्यावर धक्के मिळताना पाहायला मिळत आहेत. अनेक अभिनेत्यांचे या काळात निधन झाले आहे. यात गायन क्षेत्रातील देखील अनेक दिग्गजांनी जगाचा निरोप घेतला आहे.

 

लता मंगेशकर, बप्पी लहरी अशा दिग्गज गायकांनी जगाचा निरोप घेतला आहे. लता मंगेशकर यांच्या निधनाने तर पूर्ण जगात शोककळा पाळण्यात आली होती. त्यांच्या निधनाचे दुःख अजून देखील चाहते विसरले नाहीत.

 

लता दीदींच्या निधनाची बातमी ताजी असताना आणखी एक बॉलिवूडला धक्का देणारी बातमी समोर आली आहे. एका प्रसिध्द गायकाचे वयाच्या 57व्या वर्षी निधन झाले आहे. 90च्या दशकात पॉपअप सिंगर म्हणून ओळख असलेले तार्सम सिंग सैनी म्हणजेच ताज यांचं निधन झाले आहे.

 

गेल्या अनेक दिवसांपासून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू होते. ताज हे बराच काळ अतिदक्षता विभागात होते. मात्र डॉक्टरांच्या प्रयत्नाने त्यांना अतिदक्षता विभागातून काढण्यात डॉक्टरांना यश आले होते.

 

मात्र त्यानंतर रूग्णालयात राहिल्या नंतर अचानक पुन्हा तब्येत बिघडल्यामुळे त्यांची प्राणज्योत मावळली आहे. त्यांचा चाहता वर्ग मोठा होता. त्यामुळे त्यांना मोठा धक्का बसला आहे. बॉलिवूड साठी देखील त्यांनी अनेक गाणी गायली होती.

 

ताज हे इट्स मॅजिक या गाण्यामुळे खऱ्या रीतीने प्रकाश झोतात आले. त्यांनी आज मेरे यार की शादी हैं, गल्ला गोरिया, प्यार हो गया, यार नचला या सारख्या दिग्गज गाण्यांना आवाज दिला आहे. त्यामुळे त्यांचे करोडो चाहते निर्माण झाले होते.

 

त्यांच्या निधनाची बातमी समजल्यावर अनेकांना मोठा धक्का बसला आहे. ते सोशल मीडियावर कमी प्रमाणात सक्रिय होते. अनेक दिग्गज लोकांनी त्यांच्या निधनावर श्रद्धांजली अर्पण केली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button