Worldcup 2011 मधील भारत – पाकिस्तान सामना फिक्स होता; पाकिस्तानच्या दिग्गज खेळाडूचा खुलासा
दिल्ली | भारताने श्रीलंकेला पराभूत करून 2011 च्या वर्ल्ड कपवर आपले नाव कोरले होते. या विश्वचषक स्पर्धेत पाकिस्तान विरुद्ध भारत असा समान होता. त्यावेळी पाकिस्तानचे पीएम भारतात आले होते. साल 2008 ते 2013 च्या काळात पाकिस्तानचे माजी राष्ट्रपती आसिफ अली झरदारी आणि माजी पंतप्रधान युसूफ रझा गिलानी हे सत्तेत होते. यावेळी या दोघांनी सामना आधीच फिक्स केला होता असे म्हटले जाते.
आता पाकिस्तानचा माजी यष्टिरक्षक झुल्करनैन हैदरने यावर सर्वांसमोर ही गोष्ट जाहीर केली आहे. त्याने रझा गिलानी यांच्यावर हा सामना आधीच फिक्स केल्याचा आरोप केला आहे. या वेळी भारताने पाकला हरवले होते. तसेच सचिनने या मॅचमध्ये दमदार कामगिरी केली होती. त्याने ८५ धावा घेत टीम इंडियाला विजयी ठरवले होते.
मात्र यावेळी पाकिस्तान खेळाडूंना अनेक वेळा सचिनला हरवण्याची संधी काढून घेतली गेली. त्यावेळी शाहिद आफ्रिदी पाकिस्तान संघाचा कर्णधार होता. पाकिस्तानने साल १९९९ नंतर प्रथमच एकदिवसीय विश्वचषकाच्या उपांत्य फेरीत प्रवेश केला होता. त्यांच्यासाठी हे सर्व नवीन होते. यावेळी जुल्करनैन हा त्यांच्या टीममध्ये नव्हता. साल २०१० मध्ये त्याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली होती.
पुढे त्याने म्हटले आहे की, ” त्यावेळी माजी मुख्य प्रशिक्षक वकार युनूस आणि आकिब जावेद हे देखील मॅच फिक्सिंगमध्ये गुंतले होते, तरीही मी त्यावेळी गप्प राहिलो कारण संघाला गंभीर परिणाम भोगावे लागले असते.” या सामन्यानंतर पाकिस्तानमध्ये अनेक वाद झाले. मात्र भारतामध्ये वर्ल्ड कप जिंकल्याचा आनंद सुरू होता. त्यामुळे झुल्करनैन हैदरच्या वक्तव्याकडे लक्ष देणे गरजे नाही.