आत्ताच्या घडामोडी

मिस युनिव्हर्स हरझानला झालाय गंभीर आजार, त्यावर उपचारही नाहीत; चाहत्यांमध्ये चिंतेचे वातावरण

दिल्ली | तब्बल 21 वर्षानंतर भारत देशाला मिस युनिव्हर्स हा किताब मिळाला आहे. हा किताब मिळाल्यामुळे हे देशाचं भाग्य मानलं जात आहे. भारत देशाला हा किताब मिळवून देणारी हरझान कौर संधू कायम चर्चेत येताना पाहायला मिळत आहे.

 

तिला तिच्या दिसण्यावरून नाही तर तिच्यामध्ये असणाऱ्या कौशल्यामुळे हा किताब तिला मिळाला आहे. मात्र हरझान सध्या ट्रोल होताना पाहायला मिळत आहे. त्याचे कारण आहे ते म्हणजे तिचे वाढते वजन.

 

गेल्या काही दिवसांपूर्वी ती नेटकऱ्यांना वाढलेल्या वजनाच्या अवस्थेत दिसली होती. त्यानंतर त्यांनी फोटो काढून सोशल मीडियावर शेअर केले आणि ती ट्रोल होऊ लागली. मात्र तिचे वाढतं वजनाचं कारण तिने स्वतः दिलं आहे.

 

तिला एक आजार झाला आहे. त्या आजारावर उपचार देखील उपलब्ध नसल्याचे सांगितलं जात. या आजाराचे नाव सिलीअँक नावाचा आजार झाला आहे. त्यामुळे तीच वजन वाढलं आहे. या आजारावर उपचार नाहीत.

 

मात्र हा आजार सामान्य असल्याचेही सांगितलं जातं आहे. डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार जगात या आजाराचे 100 मधुन 1 जण आहे. मात्र जर उपचार घेतले नाहीत. तर हा गंभीर होऊ शकतो. अशीही माहिती डॉक्टरांनी दिली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button