विनोदाच्या बाबतीत रंजना पवार अशोक सराफहून सरर.. अशोक सराफ यांनी सांगितलं तो किस्सा In terms of humor, Ranjana Pawar is better than Ashok Saraf.. Ashok Saraf told that story…

मुंबई | अशोक सराफ आणि रंजना पवार यांची जोडी 90 च्या दशकात होत होती. अशोक सराफ यांनी काही वर्षांपूर्वी लोकमतशी बोलताना रंजना पवार बद्दल म्हणाले की; ‘तेव्हा मराठी सिनेमांना लाभलेली ती एक सर्वात सुंदर आणि गुणी अभिनेत्री होती. एखादी गोष्ट जर आपल्याला येत नसेल तर त्यासाठी कितीही मेहनत करण्याची तिची तयारी असायची.

Join WhatsApp Group

 

एखादी गोष्ट करताना जर ती डावी- उजवी झाली तर तिला आवडायचं नाही. ही गोष्ट मला जमत नाही म्हणजे काय असा सतत प्रश्न ती विचारायची. काहीही झालं तरी मी ती गोष्ट करणारच असा दुर्दम्य आशावाद तिचा असायचा. तिच्या याच स्वभावामुळे तिने आयुष्यात अनेक नवनवीन गोष्टी केल्या.

 

अशोक सराफ म्हणाले,”रंजना जेव्हा सिने-इंडस्ट्रीत आली तेव्हा तिनं सुरुवातीला विनोदी सिनेमे किंवा विनोदी भूमिका केल्याच नाहीत. तिनं विनोदी भूमिकांना सुरुवात केली ते माझ्यासोबतच. तेव्हा तिची खूप स्तुती झाली. अनेकांनी म्हटलं देखील विनोदात रंजना अशोकला भारीच पडतेय.

 

 

पण मी देखील हे ऐकून खूश व्हायचो. कारण ती नटी म्हणून ग्रेट आहे यावर तोपर्यंत मी शिक्कामोर्तब केलं होतं. अशी कोणतीच भूमिका नाही जे रंजनाला जमणार नाही हे तोवर मला कळालं होतं. तिची त्याबाबतीतील जिद्द,हट्ट याविषयी मी पुरता जाणून होतो. त्यामुळे तिचं माझ्यापेक्षा सरस ठरणं यामुळे मला वाईट वाटायचं नाही उलट माझ्या मैत्रिणीसाठी मी आनंदी असायचो.

 

 

रितेश देशमुख दिग्दर्शित ‘वेड’ सिनेमात दिसणार अशोक सराफ:
अशोक सराफ यांनी मराठीसोबतच हिंदी चित्रपट आणि मालिकांमध्ये आपल्या अभिनयाचा ठसा उमटवला आहे. रंगभूमीवरसुद्धा ते रमतात. अलीकडेच ते पद्मिनी कोल्हापुरे यांच्यासोबत ‘प्रवास’ या चित्रपटात झळकले होते. तर लवकरच ते रितेश देशमुख दिग्दर्शित वेड या चित्रपटात एका महत्त्वपूर्ण भूमिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button