स्वप्नात ये’फेम बाळ्या सिंगरच निधन; अल्पावधीत झाला होता फेमस

शहापूर| अल्पावधीतच यूट्यूबवरून प्रसिद्धी मिळालेला लोक गायक रतन दिवे उर्फ बाळ्या सिंगर याचा नदीत पडून मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. मासेमारीसाठी रतन गेला होता. नदीत बुडून त्याचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. ही घटना शहापूर तालुक्यातील पळसपाडा गावात घडली.

Join WhatsApp Group

 

याप्रकरणी शहापूर पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे. पोलिसांकडून या घटनेचा अधिक तपास सुरु आहे. दरम्यान, ‘आगं पोरी तू स्वप्नात येना’ या गाण्यामुळे अल्पावधीतच बाळ्या सिंगर युट्यूबवर प्रसिद्ध झाला होता. शहापूरमधील तरुणांमध्ये बाळा दिवे याच्या गाण्यांची विशेष क्रेझ होती. आपल्या आगळ्या वेगळ्या स्टाईलमुळे बाळ्या सिंगर यांनी शहापूर तालुक्यात आपल्या कलेतून सर्वांच्या मनात स्थान निर्माण केलं आहे.

 

आदिवासी संस्कृती आणि गीत त्याने यूट्यूबच्या माध्यमातून लोकांपर्यंत पोहचवले आहे. शहापूर तालुक्यातील बाळ्या हा लोकांच्या गळ्यातील ताईत झाला होता. ‘स्वप्नात येना’ या गाण्यामुळे त्याच्या प्रसिद्धीस अजूनच वाढ झाली. त्याची पत्नी आणि चार मुलं असा त्याचा संसार होता.

 

बाळ्या आसनगावाजवळच असलेल्या वालसेत गावातील आदिवासी पाड्यातील रहिवाशी होता. आपली आणि कुटुबांची उपजीविका चालविण्यासाठी मासेमारी, तर कधी वीटभट्टीवर मोलमजुरी करीत होता. वयाच्या 12व्या वर्षी त्याच्या आईनं त्याला टेपकॉर्डर दिला होता. तेव्हापासून तो गाणे रचू लागला.

 

कुटुंबाच्या उदरनिर्वाहासाठी बाळा मासेमारी करुन गावागावात जाऊन ते विकत असे. आदिवासी कुटुंबाचा मासेमारी करणारा मुलगा मासे विकत विकत गाणी म्हणायचा. यामुळे त्याला हळू हळू प्रसिध्दी मिळाली. त्याला ‘स्वप्नात येना’ या गाण्यामुळे अधिक लोक ओळखू लागलीत. सार्वजनिक कार्यक्रम तसेच क्रिकेट टूर्लामेंट ठिकाणी तो गाणं गायचा.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button