कोणी मागितली भिक तर कोणाला लागल्या मरताना मुंग्या; या बॉलीवुड कलाकारांना आले हृदयद्रावक मरण

मुंबई | अभिनय क्षेत्रात काम करून अनेक कलाकार मोठे झाले. त्यांनी नाव, प्रसिध्दी आणि खूप पैसा कमवला मात्र त्यांच्या शेवटच्या दिवसांत त्यांना पाणी पाजायला देखील कोणी नव्हतं. आज या बातमीमधून अशाच काही कलाकारांचे काळीज पिळवटून टाकणारे मृत्यू जाणून घेणार आहोत.

Join WhatsApp Group

 

परवीन बाबी – परवीन बाबी ही ७० आणि ८० च्या दशकातील ग्लॅमरस अभिनेत्री होती. तिच्या कारकिर्दीत तिने अमिताभ बच्चनपासून ते शशी कपूरपर्यंत अनेक दिग्गज कलाकारांसोबत अभिनय केला. तीला स्किझोफ्रेनिया नावाचा मानसिक आजार झाल्याचे निदान झाले होते. परवीन बाबीचे नाव अनेक नामवंत कलाकारांबरोबर जोडले गेले होते. मात्र तिचे कुणाशीही लग्न होऊ शकले नाही. प्रेमात असलेल्या अपयशामुळे तिला अनेक व्यसने लागली होती. यातच 20 जानेवारी 2005 रोजी तिचा मृत्यू झाला. बरेच दिवस तिचा मृत देह घरात पडून होता. तिचे निधन झाले हे देखील कुणाला माहीत नव्हते. नंतर घरातून घान वास येऊ लागल्याने पोलीस तिथे आले त्यावेळी तिचे शव तिथे सापडले.

 

सावी सिद्धू – सावी सिद्धू या अभिनेत्याचा देखील खूप विचित्र पद्धतीने मृत्यू झाला. गुलाल, पटियाला हाऊस आणि स्टुपीडिया यांसारख्या चित्रपटांमध्ये त्याला दमदार कामगिरी करताना तुम्ही पाहिले असेल. मात्र काही काळानंतर त्याला काम मिळणे बंद झाले. जवळ काम नव्हते हातात असलेले सर्व पैसे देखील संपले मात्र पोटात भूक होती त्यामुळे पोटाची खळगी भरण्यासाठी त्याने एका गृहनिर्माण सोसायटीत वॉचमन म्हणून काम सुरू केले. अशा दारिद्र्यात त्याचा मृत्यू झाला.

 

जगदीश माळी – अभिनेत्री अंतरा माळीचे वडीलही जगदीश माळी हे एक फॅशन आणि फिल्म फोटोग्राफर होते. कलेवरच्या प्रेमामुळे त्यांनी कधीच दुसरे कोणतेही काम केले नाही. त्यामुळे शेवटच्या दिवसांमध्ये त्यांना खूप आर्थिक चनचन भासू लागली. त्यानंतर 13 मे 2013 रोजी रस्त्यावर भीक मागताना त्यांचे निधन झाले.

 

गीतांजली नागपाल – गीतांजली नागपाल त्या काळात एक उत्तम आणि हिट अभिनेत्री होती. तिने सुष्मिता सेनसोबत रॅम्प वॉकही केला होता. एकदा कामानिमित्त ती जर्मनीला गेली. येथे ती एका पुरुषाच्या प्रेमात पडली नंतर तिने त्याच्याबरोबर लग्न केले. पण नंतर हे लग्न तुटले. त्यानंतर ती गोव्यात आली. तिथे आल्यावर तिला अनेकदा ड्रग्जचे सेवन करताना पकडले होते. तिला दारूचे देखील खूप व्यसन लागले होते. एकदा ती रस्त्यावर भीक मागताना देखील दिसली. भीक मागून पोट भरत तिचा मृत्यू झाला.

 

ए के हंगल – एके हंगल हे बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेते होते. त्यांनी 200 हून अधिक चित्रपटांमध्ये अभिनय केला आहे. आजही त्यांचे चाहते त्यांचे चित्रपट आवडीने पाहतात. मात्र या अभिनेता चा शेवट देखील खूप दुःखद झाला. शेवटच्या क्षणी त्यांच्याकडे उपचारांसाठी पैसे नव्हते त्यावेळी अमिताभ बच्चन यांनी त्यांना २० लाख रुपयांची मदत केली असे म्हटले जाते. 26 ऑगस्ट 2012 रोजी गंभीर आजाराची झुंज देत त्यांची प्राणज्योत मालवली.

 

भगवान दादा – अलबेला चित्रपट आणि ‘शोला जो भडके’ या गाण्यासाठी भगवान दादांची आजही आठवण काढली जाते. अभिनेत्याबरोबरच ते एक उत्तम दिग्दर्शक देखील होते. मात्र शेवटच्या काळात त्यांच्यावर फार आर्थिक संकट उभे राहिले होते. त्यांनी 25 खुल्यांचा असलेला बंगला विकला होता. तसेच त्यांच्याकडे असलेल्या सात मोठ्या ब्रँडच्या गाड्या देखील त्यांना विकाव्या लागल्या. आपल्या शेवटच्या क्षणी ते एका भाड्याच्या घरात राहत होते. याच घरात हृदयविकाराचा झटका येऊन त्यांचे निधन झाले.

 

सुलक्षणा पंडित – सुलक्षणा पंडित या बॉलिवूडमधील प्रसिद्ध पार्श्वगायिका होत्या. दिवंगत अभिनेते संजीव कुमार यांच्या त्या प्रेमात पडल्या. पण त्यानंतर त्यांच्या आयुष्यात मोठा भूकंप आला. त्यांना त्यांच्या प्रेमात अपयश मिळाले. त्यानंतर त्या खूप खचून गेल्या होत्या. हातात काम नसल्याने एका मंदिरात बाहेर त्यांना भीक मागताना पाहिले होते.

 

सीताराम पांचाळ – पीपली लाइव्ह आणि पान सिंग तोमर यांसारखे चित्रपट गाजवणारी अभिनेत्री सीताराम पांचाळ देखल आज आपल्यात नाही. या अभिनेत्रीला एक गंभीर आजाराने ग्रासले होते. यादरम्यान उपचारासाठी तिच्याकडे असलेला सर्व पैसा खर्च झाला. तिच्या शेवटच्या क्षणी तिच्याकडे उपचारांसाठी पैसे नव्हते. उपचारांअभावी तिने या जगाचा निरोप घेतला.

 

मिताली शर्मा – मिताली शर्मा ही भोजपुरी चित्रपटांमधील एक प्रसिद्ध अभिनेत्री होती. तिच्या अभिनयामुळे लवकरच ती मोठ्या प्रसिध्दी झोतात आली होती. मात्र नंतर तिला काम मिळणे बंद झाले. त्यामुळे बऱ्याचदा तिला चोरी करताना पकडले गेले होते. चोरी करणे आणि भीक मागणे या उद्योगातून ती आपले पोट भरत होती. अशाच परिस्थितीत रस्त्यावर एकदा तिचा मृतदेह आढळला.

 

सतीश कौल- ज्येष्ठ अभिनेते सतीश कौल हे हिंदी आणि पंजाबी चित्रपटांमधील एक प्रसिद्ध नाव आहे. त्यांनी त्यांच्या कारकिर्दीत 300 हून अधिक चित्रपटांमध्ये काम केले. मात्र, एवढा पैसा आणि प्रसिद्धी मिळवूनही त्यांच्या मुलांनी अखेरच्या दिवसात त्यांची साथ सोडली. त्यामुळे त्यांना वृद्धाश्रमात राहावे लागेल. वृद्धाश्रमामध्येच त्यांनी अखेरचा श्वास घेतला.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button