आत्ताच्या घडामोडी

मूर्ती लहान कीर्ती महान; ३ फूट उंची मात्र जिद्दीने UPSC मध्ये मारली बाजी, वाचा संघर्षमय कथा

दिल्ली | केंद्रीय लोकसेवा आयोगाची परीक्षा प्रत्येक वेळी घेतली जाते आणि अनेक इच्छुक त्यांच्या मेहनतीने यात यश मिळवतात. या उमेदवारांमध्ये देशातील लाखो मुलींचाही समावेश आहे ज्यांनी त्यांच्या कठोर परिश्रमाच्या बळावर आयएएस-पीसीएस होण्याचे त्यांचे स्वप्न पूर्ण केले आहे.

 

अनेक मुली आर्थिकदृष्ट्या कमकुवत कुटुंबातून येतात, तर अनेक आपली चांगली आणि सन्माननीय नोकरी सोडून UPSC परीक्षेला बसतात. त्यापैकी अशा मुली आहेत ज्यांना ऐकण्याची किंवा चालण्याची क्षमता नाही, परंतु शारीरिक दुर्बलता त्यांच्या स्वप्नांमध्ये कधीही येऊ शकत नाही.

 

या बातमीतून आज आम्ही एका आयएएस महिलेबद्दल सांगणार आहोत, जिला लहानपणापासूनच तिच्या कमी उंचीमुळे खूप टोमणे ऐकावे लागले, लोकांनी तिची खिल्ली उडवली पण तिने या सगळ्यांसमोर झुकते माप घेतले नाही, तिने आपली उंची कर्तुत्वाने वाढवली. ही कथा आहे आयएएस आरती डोगरा यांची.

 

आरती डोगरा या महिला आयएएस अधिकारी असून, त्यांची उंची साडेतीन फूट आहे. आरती यांचा जन्म उत्तराखंडमधील डेहराडून जिल्ह्यात झाला. आरतीच्या वडिलांचे नाव कर्नल राजेंद्र डोग्रा आणि आईचे नाव कुमकुम डोगरा आहे, त्याच्या आई एका खाजगी शाळेत मुख्याध्यापिका होत्या.

 

आरती ही तिच्या आई-वडिलांची एकुलती एक मुलगी. आरती यांची उंची 3 फूट आहे. जसजश्या त्या मोठ्या होत गेल्या तसतसे लोक त्यांच्या शारीरिक स्वरूपावर प्रश्न करू लागले. त्यांची चेष्टा करू लागले. पण आई-वडिलांनी आरतीला नेहमीच साथ दिली. सामान्य मुलांप्रमाणेच त्यांचे संगोपन केले.

 

त्यांचे सुरुवातीचे शिक्षण ब्राइटलँड स्कूलमधून झाले. यानंतर आरती यांनी दिल्ली विद्यापीठातून पदवी घेतली. परत आल्यानंतर त्यांनी डेहराडूनमधूनच पदव्युत्तर पदवी घेतली. त्यानंतर त्यांनी यूपीएससीची तयारी सुरू केली.

 

आरती यांनी त्या वेळी आयएएस असलेल्या मनीषा पनवार यांची अभ्यासादरम्यान भेट घेतली. मनीषा यांच्या मार्गदर्शनामुळे आरती यांनी आयएएस होण्याचा निर्णय घेतला. आरती डोगराने तिच्या पहिल्याच प्रयत्नात प्रशासकीय सेवा परीक्षा उत्तीर्ण केली. आरती 2006 च्या बॅचच्या राजस्थान केडरच्या IAS अधिकारी आहेत.

 

आरती डोगरा यापूर्वी डिस्कॉमच्या व्यवस्थापकीय संचालक होत्या, नंतर त्यांना अजमेरचे जिल्हा दंडाधिकारी म्हणून नियुक्त करण्यात आले. त्यांच्या कामाबद्दल संग्याचे झाल्यास, आरती डोगरा यांनी उघड्यावर शौचास जाण्याचं निर्मूलन करण्यासाठी बंको बिकानो हे स्वच्छता मॉडेल सुरू केलं. ज्याचे पीएमओनेही कौतुक केले होते.

 

अशात काही काळापूर्वी आरती डोगरांविषयी एक अफवा पसरली होती. यामध्ये मोदीजी त्यांच्या पाया पडले आहेत असे म्हटले जात होते. तेव्हा तसा फोटो देखील व्हायरल झाला. फोटो मध्ये दाखवलेली व्यक्ति आयएएस ऑफिसर आरती डोगरा नसून शिखा रस्तोगी आहेत. हे नंतर समोर आले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button