इडलीने घेतला तरुणीचा जीव, वाचून डोळ्यात पाणी येईल

अहमदनगर : सध्या बारावीच्या परीक्षा चालू असल्याने विद्यार्थी आणि पालक अभ्यासाबरोबरच खाण्यापिण्याचीही चांगलीच काळजी घेत असल्याचं दिसतं. परंतु अहमदनगर जिल्ह्या मध्ये लोणी या गावात एक दुर्दैवी घटना घडली आहे. लोणी गावातील बारावीचे पेपर देत असणाऱ्या एका विद्यार्थिनीने आपल्या आजोबांसोबत रात्रीचे उरलेले इडली-सांबर खाल्ले. त्यानंतर आजोबा आणि नात या दोघांनाही विषबाधा झाली. परंतु त्यांच्यावर उपचार चालू असताना विद्यार्थीनीचा सोमवारी दुपारी मृत्यू झाला.
मिळालेल्या माहितीनुसार तेजस्विनी मनोज दिघे असे विषबाधा झालेल्या विद्यार्थिनीचे नाव आहे. चांगले शिक्षण घेऊन डॉक्टर होण्याचे तेजस्विनी चे स्वप्न मात्र अपूर्णच राहिले. या दुर्दैवी घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. सुदैवाने तिचे आजोबा या घटनेतून बचावले आहेत.
यासंबंधी माहिती अशी मिळाली की, लोणी या गावची तेजस्वनी दिघे बाभळेश्वर येथील कनिष्ठ महाविद्यालयात बारावीचे शिक्षण घेत होती. तेजस्विनी ची बारावीची परीक्षा सुरू होती. तिचा नंबर प्रवरानगर येथील केंद्रावर आला होता. विज्ञान शाखेचे काही पेपर तेजस्विनी ने दिले होते. गेल्या आठवड्यात बुधवारी रसायनशास्त्राचा पेपर होता. त्या दिवशी सकाळी तेजस्विनी ने आणि तिचे आजोबा भीमराज दिघे यांनी रात्रीचे राहिलेले इडली-सांबर खाल्ले.
भीमराज दिघे हे रयत शिक्षण संस्थातून मुख्याध्यापक म्हणून सेवानिवृत्त झाले आहेत. रात्रीचे राहिलेले इडली सांभर खाणे त्यांना चांगलेच महागात पडले. थोड्याच वेळातच तेजस्विनी आणि तिचे आजोबा यांना त्रास होऊ लागला. त्रास होऊ लागल्यामुळे त्यांना लोणी येथील प्रवरा मेडिकल ट्रस्टच्या रुग्णालयात अडमीट करण्यात आले. परंतु त्यांचे पोट दुखत असल्याची तक्रार होती. डॉक्टरांना, नेमके निदान होत नव्हते. त्यामुळे दोघांनाही प्रथम संगमनेरला आणि त्यानंतर पुण्यातील केईएम हॉस्पिटल मध्ये हलविण्यात आले.
तेव्हापासून त्या दोघांवर ही पुण्यातच उपचार सुरू होते. तेजस्विनी ची एका बाजूला मृत्यूशी लढाई चालू होती तर दुसरीकडे बारावीचे राहिलेले पेपर बुडत होते. शेवटी तेजस्विनी जगण्याची लढाई मध्ये हरली. सोमवारी दुपारी तेजस्विनी चा रुग्णालयातच मृत्यू झाला. तिचे आजोबा मात्र या विष बाधेमधून बचावले आहेत.
तेजस्विनी सायन्स या शाखेतून बारावीचे शिक्षण घेत होती. डॉक्टर होण्याचे तेजस्विनी चे स्वप्न होते. त्यासाठी तेजस्विनी ने भरपूर अभ्यासही केला होता. पहिले काही पेपर सोडवल्यांनतर तिच्यावर असे दुर्दैव ओढावले. त्यात तेजस्विनी चा मृत्यू झाला. तिचे आणि कुटुंबयांचेही स्वप्न पूर्णपणे भंगले आहे. यामुळे तेजस्विनी च्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर पसरला आहे. या घटनेने परिसरातून हळहळ व्यक्त होत आहे.