‘मी वाईट नाही, पण परिस्तिथी…’ मुले आणि पत्नीची हत्या करून तरुणाने स्वतःला संपवलं; वाचून डोळ्यात पाणी येईल

इंदूर | आर्थिक परिस्थिती हालाखीची झाल्यानंतर मनात विचार येतो तो म्हणजे कोणत्या तरी बँक किंवा फायनान्स मधून कर्ज घ्यायचं आणि ते हप्त्यांनी भरायचे. मात्र त्यानंतर कर्ज घेतल्यावर आणखी काही तरी आर्थिक अडचणी समोर उभ्या राहतात आणि घेतलेले कर्ज फेडू शकत नाही.

 

आणि अशामुळे शेवटचा पर्याय म्हणून आत्महत्या करण्याचा विचार डोक्यामध्ये येतो. अशीच एक धक्कादायक घटना इंदूर परिसरात घडली आहे. सदर घटनेने पूर्ण जिल्ह्यात शोककळा पसरली आहे. कर्जाचा बोजा झेपत नसल्याने एका व्यक्तीने अत्यंत टोकाचे पाऊल उचलले आहे.

 

आपल्या लहान चिमुकल्यांची हत्या करून स्वतः आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. आधार कार्ड आणि Pancard च्या माध्यमातून ऑनलाईन कर्ज देणाऱ्या काही कंपन्या आहेत. या कंपन्यांमधून अमित यादव नावाच्या एका व्यक्तीने कर्ज घेतले. मात्र त्यानंतर घेतलेले कर्ज तो फेडू शकत नव्हता.

 

समाजामध्ये असलेली इज्जत जाईल याच्या भीतीने त्याने अत्यंत टोकाचं पाउल उचललं आहे. आपल्या लहान चिमुकल्यांना संपवून त्याने स्वतः आत्महत्या केली आहे. त्यामुळे परिसरात शोककळा पसरली होती. त्याने सुरुवातीला आपल्या लहान दोन मुलांची हत्या केली आणि त्यानंतर पत्नीला संपवलं.

 

आणि शेवटी एक चिठ्ठी लिहून त्याने स्वतः देखील आत्महत्या करण्याचा निर्णय घेतला. काही नातेवाईकांनी त्याला फोन लावण्याचा प्रयत्न केला मात्र त्याचा फोन लागला नाही. त्यामुळे नातेवाईक थेट त्याच्या भाड्याने घेतलेल्या खोलीवर पोहचले मात्र दरवाजा कोणी उघडत नसल्याने त्यांनी तात्काळ बाळगंगा पोलिसांना बोलवले.

 

पोलिसांनी घटनास्थळी येऊन सदर दरवाजा तोडला, आणि त्याठिकाणी असलेले मृतदेह पुढील कायदेशीर कारवाई साठी पाठवण्यात आले. सदर घटनेने पूर्ण राज्यात वातावरण तापले होते. “मी माणूस वाईट नाही, मात्र परिस्थिती तशी नाही, मी अनेक ऑनलाईन ॲप मधून कर्ज घेतले आहे. ते मी फेडू शकत नाही. म्हणून मी हे पाउल उचलत आहे. पोलिसांनी माझ्या कुटुंबाला त्रास देऊ नये.” अशी चिठ्ठी घटनास्थळी सापडली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button