इलेक्ट्रिक चार्जिंग स्टेशन सुरू करा आणि कमवा लाखो रुपये, वाचा संपूर्ण माहिती; How To Start Ev Station In Maharashtra 2026

March 1, 2026 3:47 PM
How To Start Ev Station In Maharashtra 2026

How To Start Ev Station In Maharashtra 2026 | अनेक तरुण व्यवसायात येऊ इच्छितात मात्र योग्य व्यवसाय निवडून त्यामध्ये यशस्वी कसे व्हायचे याचा फॉर्म्युला तरुणांकडे नसतो, त्यामुळे कोणताही व्यवसाय करण्याच्या पूर्वी ते किंचित घाबरतात आणि यामुळे ते व्यवसाय सुरू करत नाहीत. आज मी तुम्हाला अशा एका व्यवसायाबद्दल माहिती सांगणार आहे, ज्या व्यवसायाला भवितव्य आहे. आणि आता जर हा व्यवसाय सुरू केला तर १०० टक्के यामध्ये यश मिळू शकते. सध्या बाजारात व्यवसायांमध्ये मोठी स्पर्धा आपल्याला पाहायला मिळत आहे. या स्पर्धेच्या युगात व्यवसायात टिकून रहाणे हे फार कमी लोकांना जमत आहे. जो लोकांच्या भवितव्याचा विचार करतो, त्याला व्यवसायात यश निश्चित मानले जाते.

सध्या राज्यासह देशात इलेक्ट्रिक गाड्यांचे प्रमाण वाढत चालले आहे. इंधनावर चालणाऱ्या गाड्यांची संख्या कमी होताना पाहायला मिळत आहे. देशात प्रदूषण वाढल्याने डिझेल वर चालणाऱ्या गाड्यांवर बंदी आणण्याच्या तयारीत शासन दिसत आहे. दिल्ली सरकारने डिझेलवर चालणाऱ्या वाहनांवर बंदी आणण्याचा मोठा निर्णय कौतुकास्पद आहे. वाढत्या डिझेल दरामुळे नागरिकांच्या खिशाला कात्री लागताना पाहायला मिळत आहे. त्यामुळे इलेक्ट्रिक वाहनाच्या संख्येत मोठी वाढ होत आहे. टू व्हीलर वाहनापासून ते ट्रक पर्यंत इलेक्ट्रिक वाहनांची निर्मिती करून यशस्वी प्रयोग केला गेला. टू व्हीलर गाडी, तीन चाकी रिक्षा, कार ही वाहने तुम्हाला मार्केट मध्ये पाहायला मिळत असतील. या वाहनांना इंधन लागत नसल्याने प्रदूषण कमी होत नाही. आणि नैसर्गित स्थिती देखील चांगली राहत आहे. त्यामुळे भविष्यात १०० टक्के इलेक्ट्रिक गाड्या रस्त्यांवर धावल्या पाहिजेत हे मुख्य धोरण शासनाचे आहे.

शासनाने इलेक्ट्रिक वाहनांसाठी अनेक योजना देखील राबविल्या आहेत, त्यातील महत्वाची योजना म्हणजे इलेक्ट्रिक वाहन खरेदी करताना लागणारा टॅक्स सरकारने कमी केला आहे. त्यासोबतच देशातील काही महत्वाच्या एक्सप्रेसवर देखील टोल टॅक्स झीरो करून शासनाने इलेक्ट्रिक वाहन खरेदी करणाऱ्यांना मोठ प्रोत्साहन दिले आहे. डिझेल आणि पेट्रोलच्या तुलनेत इलेक्ट्रिक वाहनांना मोठे फिचर्स देण्यात आले आहेत. अनेक कार्स ५ स्टार रेटिंग सह रस्त्यांवर धावताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. त्यामुळे वाहन घेताना अनेकजण इलेक्ट्रिक वाहनांचा पर्याय निवडत आहेत. आज मी तुम्हाला या वाहनांना ज्या चार्जर सुविधेमुळे चार्जिंग केली जाते अशा ev charging station व्यवसायाबद्दल सविस्तर माहिती सांगणार आहे.

वाढत्या इलेक्ट्रिक वाहनाच्या संख्येला पाहताना तुम्ही जर एक Ev Electric Charging Station हा व्यवसाय सुरू केला तर तुम्हाला या व्यवसायातून लाखो रुपयांचा फायदा होऊ शकतो. सध्या या व्यवसायामध्ये मोठी स्पर्धा नाही. त्यामुळे तुम्ही जर हा व्यवसाय सुरू केला तर काही वर्षात या व्यवसायाला सोन्याचे दिवस येणार आहेत. पुढील काही वर्षांमध्ये सर्वच गाड्या इलेक्ट्रिक स्वरूपाच्या दिसतील त्यामुळे त्यांना चार्जिंग साठी चार्जिंग स्टेशनची गरज भासणार आहे. त्यामुळे या व्यवसायात तुम्ही पाऊल टाकले तर हा व्यवसाय झटपण तुम्हाला त्यातून चांगला रिटर्न देऊ शकतो. या व्यवसायाची सविस्तर माहिती आपण जाणून घेऊ.

या व्यवसायात गुंतवणूक किती करावी लागेल?

Ev charging station व्यवसाय सुरू करण्यासाठी तुम्हाला १० लाखांपासून ते ५० लाखांपर्यंत गुंतवणूक करावी लागणार आहे. यासाठी लागणारी जागा, त्याठिकाणी करण्यात येणारे बांधकाम, विजेसाठी ट्रान्सफॉर्मर, मशीन या गोष्टींची आवश्यकता लागते. सोबत मार्केटिंग साठी देखील खर्च करावा लागतो. कसे की बॅनर, तुमचा व्यवसाय आहे यासाठी गावोगावी कळवणे. ऑनलाईन मार्केटिंग या सर्व गोष्टींसाठी गुंतवणूक करावी लागते. बँका चार्जिंग स्टेशन सुरू करण्यासाठी अनुदानावर कर्ज उपलब्ध करून देतात. त्यामुळे जर तुमच्याकडे शिल्लक रक्कम नसेल तर तुम्ही हा व्यवसाय बँकेतून कर्ज घेऊन सुरू करू शकता.

२ प्रकाराच्या मशीन मधील मुख्य फरक काय आहे?

व्यवसाय सुरू करण्यासाठी तुम्हाला २ पैकी एक मशीन घ्यावी लागेल. पण या दोनपैकी तुमच्या परिसरात कोणत्या मशीनची गरज आहे हे अगोदर तुम्हाला ओळखावे लागणार आहे. जर तुम्ही स्लो चार्जिंग साठी AC मशीन घेतली तर ती मशीन तुम्हाला १ लाख रुपयांपर्यंत मिळून जाईल. आणि फास्ट चार्जिंग साठी म्हणजेच मोठ्या चारचाकी गाड्यांसाठी CSS मशीन घेतली तर त्याची किंमत तुम्हाला १५ लाखांपर्यंत बसेल. प्रत्येक कंपनीच्या मशिनीच्या किमतीत फरक असतो. त्यामुळे ज्या कंपनीचे स्टेशन तुम्ही टाकाल त्या कंपनीवर मशिनरी किंमत अवलंबून आहे.

जागा निवडताना या गोष्टी लक्षात ठेवा

चार्जिंग स्टेशन सुरू करण्यापूर्वी जागा व्यवस्थित निवडा, हॉटेल व्यावसायिकांसाठी हा व्यवसाय अत्यंत चांगला आहे. हॉटेलच्या समोर हा व्यवसाय तुम्ही सुरू करू शकता. गावातील मुख्य रस्त्याच्या कडेला, मेन एक्सप्रेस रोडला, तुमच्याकडे दुकान असेल किंवा रस्त्याच्या कडेला तुमचे घर असेल तर त्याठिकाणी तुम्ही हा व्यवसाय करू शकता. जागा निवडताना अशी निवडा ज्या ठिकाणी स्पॉट असेल वाहनांची नेहमी वर्दळ असेल. अशा ठिकाणी तुम्ही हा व्यवसाय करून त्यातून लाखो रुपये कमवू शकता. सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे तुमची स्वतःची जागा आहे. ही जागा तुम्ही भाडेतत्वावर देखील घेऊ शकता. मात्र तुमच्याकडे येणाऱ्या वाहनासाठी जागा सोयीस्कर निवडा.

कायदेशीर बाबी आणि परवाना
चार्जिंग स्टेशन सुरू करण्यासाठी परवान्याची गरज नाही मात्र तुम्हाला काही बाबी पूर्ण कराव्या लागणार आहेत. म्हणजे तुम्ही महावितरण कंपनीकडून इंडस्ट्रियल किंवा कमर्शियल लाईट कनेक्शन घेतलेले असणे आवश्यक आहे. सोबतच तुम्ही ज्या गावामध्ये किंवा नगर पालिकेच्या हद्दीमध्ये हा व्यवसाय करत आहात त्यांच्या कडून ना हरकत प्रमाणपत्र घेणे आवश्यक आहे. बँकेचे अकाउंट खोलणे आणि इतर बाबींसाठी तुम्हाला शॉपक्ट आणि उद्यम आधार काढणे गरजेचे असते. चार्जिंग स्टेशनवर पार्किंग आणि उजेडाची सोय करणे देखील सुरक्षेसाठी चांगले आहे.

व्यवसाय चालविण्यासाठी किती कामगार लागतील?
हा व्यवसाय चालविण्यासाठी कामगारांची आवश्यकता लागत नाही. पण सुरुवातीच्या काळामध्ये तुम्ही एक कामगार कामाला ठेऊ शकता, त्याला तुम्ही लोकांना मार्गदर्शन करण्याचे काम देऊ शकता. चार्जिंग स्टेशन हे पूर्णपणे ऑनलाईन पद्धतीने चालते. अँप किंवा वेबसाईट वरून वाहन चालक चार्जिंग साठी पैसे भरतात त्यानंतर तुम्हाला तुम्ही ज्या कंपनीकडून एजन्सी घेतली आहे. त्या कंपनीचे कमिशन कट करून तुमच्या बँक खात्यात तुमचा इन्कम जमा केला जातो. त्यामुळे या व्यवसायासाठी जास्त कामगारांची गरज भासत नाही.

मान्यता प्राप्त कंपन्यांकडून एजन्सी कशी घ्यावी? (How To Apply Charging Station Lincence In Maharashtra)
ज्या कंपन्यांचे भारत देशामध्ये चार्जिंग स्टेशन नेटवर्क चांगले आहे. अशा कंपन्यांची एजन्सी घेऊन तुम्ही हा व्यवसाय सुरू करू शकता. टाटा पॉवर, EZ charge, Bolt Earth, charge zone, statiq, Bijlify या कंपन्यांना त्यांच्या वेबसाईट वर जाऊन तुम्ही तुम्हाला हवे आहे त्या ठिकाणी चार्जिंग स्टेशन घेऊ शकता. मागणी केल्यानंतर कंपनीचा माणूस येऊन तुमची जागा आणि इतर गोष्टी पाहील. त्यानंतर त्याबद्दल तुम्हाला सांगितले जाईल आणि तुम्हाला agreement करण्यासाठी बोलावल जाईल. How Start Ev charging station in Maharashtra

Mr. Ganesh Chavan

Ganesh Tanaji Chavan is a digital media professional and founder of Maharashtra Update. He has experience working with Pudhari Media Group and Loksatta.com, delivering reliable news, government scheme updates, and job information across Maharashtra. His mission is to provide accurate and trustworthy information to readers.

Subscribe YouTube

Subscribe

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment