पोलिस कॉन्स्टेबलला किती पगार असतो? – Police Constable la Pagar Kiti Asato?

Police Constable, Police Officer, IPS Office, Police Inspector Monthaly Salary

पुणे | एका पोलिस कॉन्स्टेबलला महिन्याला किती वेतन असते? हा प्रश्न तुम्हाला सर्वांनाच पडला असेल. दीपावली सन तसेच कितीही मोठा सन असला तरी पोलिस (police) पदावर रुजू असलेल्या जन सेवकाला सुट्टी मिळत नसते. आपण सर्वजण घरात गोड पंचपकवान खात असतो आणि पोलीस मात्र रस्त्यावर किंवा एखाद्या केस मध्ये अडकून नोकरी करत असतात.

Join WhatsApp Group

 

पोलिस (police) पद सामान्य व्यक्तींना खूप चांगलं वाटतं असते. मात्र पोलिसांचा संघर्ष त्यांचा त्यांनाच माहित असतो. अहोरात्र कष्ट करून नागरिकांना सुरक्षा देण्याचं काम पोलिस करत असतात. गुन्हेगारी (crime) क्षेत्र असो वा एखादा अपघात, या ठिकाणी प्रथम पोहचतात.

 

गुन्हेगारांसोबत गुन्हेगारा सारखं वागतात. आणि सामान्यांना सरळ प्रेमळ वागणूक देतात. अशा या आपल्या पोलीस मित्रां बद्दल आपण माहिती जाणून घेणार आहोत. अहोरात्र जनतेची सेवा करणाऱ्या पोलीस कॉन्स्टेबलला (police Constable) महिन्याला वेतन किती असते. हे जाणून घेणार आहोत.

 

एका संकेतस्थळाने (website) दिलेल्या माहिती नुसार पोलिसांचे कामावर रुजू झाल्यानंतरचे वेतन हे १६ हजार ते २० हजारांच्या आसपास असते. हे वेतन कामा बरोबर वाढत जाते. सातवा वेतन आयोग लागू झाल्यानंतर पोलिसांच्या वेतनात मोठी वाढ झाली होती. जसे पद आणि नोकरीचा कालावधी वाढेल, त्याच बरोबर पगारात देखील मोठी वाढ होते.

 

• उपनिरीक्षकाला किती पगार असतो? How much is the salary of a sub-inspector?
पोलिस खात्यात उपनिरीक्षक हे पद उच्च स्तरीय मानलं जातं. या पदावर रुजू झाल्यानंतर ३९ हजारांच्या आसपास वेतन मिळते. पोलिस कॉन्स्टेबल पेक्षाही या पदाचा पदभार जास्त असतो. कामगिरी करून उच्च पदावर याची बढती होण्यास सहज शक्य मानलं जातं. तसेच थेट स्पर्धा परीक्षा मधून देखील या पदावर नियुक्ती होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button