सिद्धू मुसेवाला नंतर आता आणखीन एका प्रसिध्द गायकाची गोळ्या झाडून हत्या; कला विश्वावर शोककळा

दिल्ली | सिद्धू सिंग मुसेवाला या गायकाची २९ मे रोजी भर रस्त्यावर गोळ्या झाडून हत्या केली गेली. हे प्रकरण ताजे असतानाच आता आणखीन एका रॅपरची अशीच निर्घृणपणे हत्या करण्यात आली आहे. या रॅपरचे नाव मॅरियल ऑर असं आहे.

 

ही हत्या त्याच्याच जवळच्या मात्र अनोळखी व्यक्तीने केली आल्याचं म्हटल जातं आहे. मॅरियल हा अटलांटामधील रहिवासी आहे. त्याला रॅपर ट्रबल या नावाने ओळखले जाते.

 

जॉर्जियामध्ये त्याची हत्या झाली असून संशयित आरोपी फरार आहे. पहाटे कॉनयेर्स येथील सेंट जेम्स अपार्टमेंटमध्ये त्याचा मृतदेह आढळून आला. घरगुती वादातून त्याची हत्या झाली असल्याचं म्हटल जात असलं तरी त्याच्या हत्येचं गूढ अद्याप कायम आहे. रॉकडेल काउंटीचे प्रवक्ते जेडीडीया कॅंटी यांनी एका पत्रकार परिषदेत या घटनेविषयी सांगितले.

 

रॅपर ट्रबल हा पहाटे ३ च्या सुमारास त्याच्या एका मैत्रिणीला भेटायला घराबाहेर पडला होता. त्याचा मैत्रिणीशी त्याची भेट झाल्यानंतर ही हत्या झाली आहे. जेमायकल जॉन्स याने त्याची हत्या केली असल्याचं म्हटलं जातं आहे. पोलिसांनी त्याच्या विरोधात अटक वॉरंट जारी केलं असून त्याचा शोध घेणं सुरू आहे.

 

संशयित व्यक्तीला रॅपर ट्रबलची मैत्रीण ओळखत होती. मात्र रॅपर त्याला ओळखत नव्हता. सदर प्रकरणी आणखीन तपास सुरू आहे. रॅपरच्या निधनाने आता तेथील संपूर्ण परिसरात शोकाकुल आणि भीतीचे वातावरण पसरले आहे.

 

रॅपरच्या डेफ जाम या लेबलने त्याला श्रद्धांजली वाहत त्याच्या कुटुंबीयांप्रती आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. त्यांनी असे म्हटले आहे की, ‘आमचे विचार आणि प्रार्थना ट्रबलची मुलं, जवळच्या व्यक्ती आणि चाहत्यांस आहेत. तो त्याच्या शहराचा खरा आवाज होता आणि तो ज्या समाजाचे प्रतिनिधित्व करत होता त्यांच्यासाठी तो प्रेरणा होता.”

 

ट्रबल याने साल २०११ मध्ये ‘डिसेंबर सेव्हेंथ’ या मिक्सटेपमधून रॅपिंगच्या दुनियेत प्रवेश केला होता. साल २०१८ मध्ये त्याचा ‘एजवूड’ हा अल्बम प्रसिद्ध झाला होता.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button