हॉलीवुड हादरलं! अपघातात दिग्गज अभिनेत्रीचे निधन; वयाच्या ५३व्या वर्षी घेतला जगाचा निरोप
मुंबई | गेल्या ७ दिवसांपासून ऐनी हेचे त्यांच्या मृत्यूशी झुंज देत होत्या. मात्र आता त्यांची ही झुंज संपली आहे. नुकतीच त्यांच्या निधनाची बातमी समोर आली आहे. वयाच्या ५३ व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला आहे. त्यांच्या निधनाने हॉलीवुडवर शोककळा पसरली आहे.
लॉस एंजिल्सच्या मार विस्टा येथील परिसरात एका बिल्डिंगला आग लागली होती. त्यावेळी अभिनेत्री त्यांच्या गाडीतून त्याच रस्त्याने जात होत्या. यावेळी त्यांची गाडी त्या आग लागलेल्या बिल्डिंगला धडकली. यात त्यांचा मोठा अपघात झाला. त्यांच्या मेंदूला गंभीर दुखापत झाली.
यावेळी त्यांना खूप वेदना होत होत्या. ही घटना घडताच अग्निशमन दलाची गाडी घटनास्थळी पोहोचली. त्यांनी अभिनेत्रीला तेथून बाहेर काढले आणि तेव्हापासून त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. तसेच त्यांच्यावर उपचार सुरू होते. मात्र हे सर्व उपचार आता संपले असून त्यांची प्राणज्योत मालवली आहे. माध्यमांमध्ये आलेल्या माहितीनुसार त्यांचे बरेचसे अवयव दान केले जाणार आहेत.
अभिनेत्रीच्या निधनानंतर अनेक कलाकार मंडळींनी त्यांना सोशल मीडिया मार्फत भावपूर्ण श्रद्धांजली वाहिली आहे. यामध्ये बॉलीवूड आणि हॉलीवुड अभिनेत्री प्रियंका चोप्राने देखील एक पोस्ट शेअर करत ऐनी यांना श्रद्धांजली वाहिली आहे. तिने आपल्या पोस्टमध्ये लिहिले आहे की, ” मला अभिमान आहे की मी ऐनी यांच्यासारख्या मोठ्या अभिनेत्री बरोबर काम केले आहे. त्या स्वभावाने खूप छान होत्या. मी त्यांच्याकडून खूप काही शिकले. तुमच्यासाठी माझ्या हृदयात एक खास जागा आहे. तुमच्या आत्म्याला शांती मिळो.” असे तिने यात म्हटले आहे.
तसेच यावेळी ऐनी हेचे यांचा मुलगा होमरने आपल्या आईच्या निधना विषयी म्हटले आहे की, ” माझा भाऊ ऍटलस आणि मी माझ्या आईच्या प्रेमापासून आज खूप दूर गेलो आहोत. मला आशा आहे की, गेल्या ७ दिवसांत माझ्या आईने सहन केलेल्या त्रासातून तिची मुक्तता झाली आहे. या दिवसांमध्ये अनेक व्यक्तींनी आमची चौकशी केली. तसेच अनेकांनी माझ्या आईच्या तब्येतीबद्दल देवाकडे प्रार्थना केली. या सर्वांचा मी कायम ऋणी राहील.”
साल १९९७ मध्ये प्रदर्शित झालेल्या “डोनी ब्रास्को” आणि “वोल्कॅनो” या चित्रपटांमध्ये त्यांनी दमदार अभिनय केला होता. त्यानंतर त्यांनी अभिनय क्षेत्रात मोठी कामगिरी केली. डान्सिंग विथ द स्टार मध्ये देखील त्या दिसल्या होत्या. हॉलीवुड मधील या प्रसिद्ध अभिनेत्रीचा मृत्यू झाल्याने सर्वच कलाकार हळहळ व्यक्त करत आहेत.