आत्ताच्या घडामोडी

हॉलिवूड हादरलं! प्रसिध्द अभिनेत्याचे झोपेतच निधन; अभिनय क्षेत्रात खळबळ

दिल्ली | गेल्या काही दिवसांपासून मनोरंजन सृष्टीला धक्क्यावर धक्के बसत आहेत. अनेक दिग्गज अभिनेत्यांच्या निधनाने चित्रपट सृष्टीत हळहळ व्यक्त केली जात आहे. बड्या आणि दिग्गज अभिनेत्यांच्या निधनामुळे चाहत्यांना धक्क्यावर धक्के मिळत आहे.

 

लता मंगेशकर, रमेश देव, बप्पी लहरी यांच्या सारख्या दिग्गजांनी 2022 या वर्षात जगाचा निरोप घेतला आहे. त्यामुळे हे वर्ष अभिनय क्षेत्रासाठी धोक्याच मानलं जातं आहे. मात्र बॉलिवूड नंतर आता हॉलिवूड मधील देखील अभिनेते जगाचा निरोप घेताना पाहायला मिळत आहे.

 

प्रसिध्द हॉलिवूड अभिनेते रे लिओटा यांचं निधन झाले आहे. वयाच्या 67व्या वर्षी त्यांनी जगाचा निरोप घेतला आहे. त्यामुळे जगावर शोककळा पसरली आहे. त्यांनी अनेक हॉलिवूड मधील चित्रपटात काम करून करोडो चाहत्यांच्या मनावर राज्य केलं आहे.

 

गुडगेलस या चित्रपटात त्यांनी मुख्य भूमिका साकारली होती. त्यानंतर ते प्रकाश झोतात आले होते. सध्या ते एका चित्रपटाचे चित्रीकरण करत होते. मात्र त्याच दरम्यान त्यांच्या निधनाने शोककळा पसरली आहे. अचानक त्यांच्या जाण्याने चाहत्यांना आणि निर्मात्यांना मोठा धक्का बसला आहे.

 

शुटिंग केल्यावर रात्री झोपेतच त्यांचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे. त्यामुळे त्यांच्या निधनाची आकस्मित नोंद करण्यात आली आहे. त्यांच्या निधनाचे नेमके कारण काय? असा प्रश्न सर्वांना पडला आहे.

 

सदर प्रकरणी त्या ठिकाणचे पोलिस तपास करत आहेत. मात्र पोलिसांनी सध्या आकस्मित निधनाची नोंद केली आहे. या पाठीमागे कोणता घातपात तर नाही ना असा देखील सवाल व्यक्त केला जात आहे. त्यामुळे पोलिसांनी कसून चौकशी करण्याची मागणी कुटुंबांनी केली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button