आत्ताच्या घडामोडीमनोरंजन

हिंदी चित्रपटसृष्टी हादरली! प्रसिध्द अभिनेत्याचे निधन; ८२व्या वर्षी घेतला जगाचा निरोप

आसाम | गेल्या अनेक दिवसांपासून मनोरंजन विश्वाशी निगडित अनेक व्यक्ती या जगाचा निरोप घेत आहेत. काही संगीतकार तर काही अभिनेते आणि काही अभिनेत्री आपल्याला कायमचे सोडून गेले आहेत. अशात यामध्ये काहींचे वृद्धापकाळाने निधन झाले आहे. तर काहींनी आत्महत्या तर काहींची हत्या करण्यात आली आहे. अशाच मनोरंजन विश्वातील आणखी एका दिग्गज अभिनेत्याचा मृत्यू झाला आहे.

 

मनोरंजन विश्वातून सतत निधनाच्या बातम्या समोर येत आहेत. आशाता आता आणखीन एका आसामी दिग्गज अभिनेत्याचे निधन झाले आहे. प्रख्यात आसामी अभिनेते साधन हजारिका यांचे शनिवारी गुवाहाटी येथील नेमकेअर रुग्णालयात निधन झाले. वयाच्या 82 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला.

 

त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुली, सुना, नातवंडे असा परिवार आहे. त्यांनी त्यांच्या कारकिर्दीत ‘बेझब्रुवा’, ‘निजरा’, ‘ललिता’, ‘पिता-पुत्र’ यांसारख्या अनेक हिट आसामी चित्रपट आणि मालिकांमध्ये काम केले. यासह त्यांनी ‘कांचघर’, ‘खोज’, ‘सेंदूर’, ‘सुरुय’, ‘बोहागर दुपरिया’, ‘पिता-पुत्र’, ‘प्रभाती पाखीर गीत’, ‘मन मंदिर’, ‘प्रतिमा’, ‘अजला ककाई’, ‘भाई भाई’, ‘पानी’, ‘ड्रीम’, ‘गरखिया’ और ‘सेउजी धरणी धूनिया’ या चित्रपटांमध्ये देखील आपल्या अभिनयाची जादू दाखवली आहे.

 

त्यांच्या निधनाने चाहते आता शोक सागरात बुडाले आहेत. अनेक जण सोशल मीडियावर त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहत आहेत. साधन हजारिका यांचा जन्म 9 मार्च 1940 रोजी कोंवरपूर, शिवसागर येथे झाला. गुवाहाटी दूरदर्शन केंद्राच्या स्थापनेपासून साधन हजारिका यांनी विविध टेलिफिल्म आणि मालिकांमध्ये विविध भूमिका साकारल्या आहेत. ज्यामध्ये ‘लेहर’, ‘अनेक फुले सुरभी’, ‘मातल घोरा’, ‘कालरत्न’, ‘संध्यायात्रा’, ‘सेतू’, ‘शाहुई’, ‘जोवई’, ‘मेजर साहिब’ या त्यांच्या प्रमुख आणि गाजलेल्या भूमिका आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button