हिंदी चित्रपटसृष्टी हादरली! ३००हून अधिक चित्रपटात काम केलेल्या अभिनेत्याचे निधन; देशावर शोककळा

दिल्ली | गेल्या काही दिवसांपासून अभिनय क्षेत्रातील अनेक दिग्गज कलाकार जगाचा निरोप घेत आहेत. २०२२ या वर्षात अनेकांनी जगाचा निरोप घेतला आहे. त्यामुळे अभिनय क्षेत्रात शोककळा पसरली आहे. लता मंगेशकर, बप्पी लहरी
केके, रमेश देव, सिद्धू मुसेवाला या सारख्या दिग्गजांनी जगाचा निरोप घेतला आहे. लता मंगेशकर यांच्या निधनाला अनेक महिने होऊन गेले मात्र त्यांना अजून देखील चाहते विसरू शकले नाहीत. त्यांच्या आठवणीत अनेक चाहते सध्या आहेत.
अभिनय क्षेत्राला कोणाची नजर तर लागली नाही ना? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. अशीच एक अजून धक्कादायक माहिती समोर आली आहे. प्रसिध्द दिग्दर्शक आणि अभिनेत्याचे निधन झाले आहे. त्यामुळे अभिनय क्षेत्रात शोककळा पसरली आहे.
हिंदी, मल्याळम, तेलगू या सारख्या भाषेत त्यांनी काम करून करोडो चाहत्यांच्या मनावर राज्य केलं होते. प्रताप पोथेन असे त्यांचे नाव होते. त्यांनी वयाच्या ७०व्या वर्षी चेन्नई मध्ये अखेरचा श्वास घेतला आहे. त्यामुळे पूर्ण भारतीय चित्रपट सृष्टीला हा मोठा धक्का बसला आहे.
चेन्नई मधील एका फ्लॅट वर त्यांचा मृतदेह आढळून आला आहे. त्यामुळे संशय व्यक्त केला जात आहे. त्यांच्या निधनाने जेष्ठ कलाकार गेल्याचे दुःख व्यक्त केलं जात आहे. अनेक दिग्गजांनी त्यांना सोशल मीडियावर श्रद्धांजली अर्पण केली आहे.