आत्ताच्या घडामोडीक्रिकेट

क्रिकेट खेळताना तो मैदानात कोसळला, क्रिकेटरचां झाला हृदयद्रावक शेवट

पंढरपूर | कोणताही खेळ खेळत असताना यामध्ये आपण पडतो, आपल्याला इजा होते. अशात क्रिकेटच्या मैदानावर बऱ्याचदा चेंडू लागल्याने अनेकांचे मृत्यू झाले आहेत. ऑस्ट्रेलियाच्या फिलिप ह्यूजेस याच्या डोक्याला चेंडू लागल्याने त्याचा मृत्यू झाला होता. आता असाच काहीसा प्रकार पुन्हा एकदा घडला आहे.

 

स्थानिक पातळीवर एका गावामध्ये सुरू असलेल्या क्रिकेटच्या स्पर्धेत 35 वर्षाच्या एका तरुणाचा मृत्यू झाला आहे. गुप्तांगाला चेंडू लागल्याने या युवकाचा जागीच मृत्यू झाला आहे. पंढरपूर येथील तावशी गावात क्रिकेटचा सामना रंगला होता. या स्पर्धेत विक्रम क्षीरसागर हा खेळाडू नेपात गाव संघाकडून फलंदाजी करत होता.

 

फलंदाजी करत असताना समोरून येणारा चेंडू खूप वेगात टाकण्यात आला. यावेळी विक्रमला समोरून येत असलेल्या चेंडूचा अंदाज आला नाही. त्यामुळे त्याचा चेंडू बॅटवर न लागता त्याच्या गुप्ता अंगाला लागला. चेंडू जोरात लागल्याने विक्रम जागीच मैदानात कोसळला.

 

त्यानंतर सर्वांनी त्याला तातडीने रुग्णालयात नेते. मात्र रुग्णालयात नेल्यानंतर डॉक्टरांनी त्याला तिथे मृत घोषित केले. आंतरराष्ट्रीय स्तरावरती सुरू असलेल्या क्रिकेट सामन्यांमध्ये प्रत्येक स्पर्धकाला सुरक्षित साधने दिली जातात. कोणताच स्पर्धकाला इजा होऊ नये म्हणून योग्य ती काळजी घेतली जाते.

 

मात्र स्थानिक ठिकाणी होत असलेल्या सामन्यांमध्ये या सर्व सुविधा पुरविल्या जात नाही. यामुळे बऱ्याच खेळाडूंचे अपघात होतात. यामध्ये अनेकांना मोठ्या दुखापती होतात. तर विक्रम प्रमाणे काहींना आपला जीव देखील गमवावा लागतो. या घटनेवरून एवढेच समजते की, क्रिकेट असो अथवा अन्य कोणताही खेळ असो आपल्या सुरक्षिततेची काळजी घेऊनच खेळाचा आनंद घेतला पाहिजे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button