आत्ताच्या घडामोडी

मुळशी पॅटर्न मधील ‘या’ अभिनेत्याची पत्नी पाहिलीत का? दिसते खूप सुंदर; करते हे काम

मुंबई | मराठी चित्रपट सृष्टीतील प्रसिद्ध अभिनेता उपेंद्र लिमये याने आजवर अनेक वेगवेगळ्या धाटणीचे चित्रपट साकारले आहेत. त्याच्यावर हरहुन्नरी अभिनयामुळे संपूर्ण महाराष्ट्रभर त्याच्या अभिनयाचा डंका वाजत आहे. उपेंद्र सोशल मीडियावर नेहमीच सक्रिय असतो. तो त्याचा अभिनय याविषयी आपल्याला माहीतच आहे. त्यामुळे आज या बातमीतून त्याच्या पत्नी विषयी जाणून घेणार आहोत.

 

उपेंद्र लिमयेच्या पत्नीचे नाव स्वाती लिमये आहे. स्वाती ही एक होमिओपॅथिक डॉक्टर आहे. कोरोना महामारीच्या काळात तिने जनतेची अविरत सेवा केली. तिच्या महान कार्यामुळे सर्व स्तरातून तिच कौतुक होत आहे. उपेंद्र आणि स्वाती हे दोघेही गोरेगाव येथे राहतात. कोरोना महामारीच्या काळात स्वाती होमिओपॅथिक औषधांची प्रॅक्टिस करत होती.

 

अशात कोरोना महामारी झपाट्याने वाढू लागली. त्यामुळे भारत सरकारच्या आयुष मंत्रालयाने अडचणीक अल्बम ३० या गोळ्या बाजारात आणल्या. या गोळ्यांचे सेवन केल्याने आपल्या शरीरातली रोगप्रतिकारक शक्ती वाढते.

 

त्यामुळे शासनामार्फत या गोळ्या अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचवण्याचा मानस होता. याच वेळेस स्वातीची प्रॅक्टिस सुरू होती. त्यामुळे तिने देखील या गोळ्या बनवल्या. तसेच गोरेगाव परिसरातील अनेक व्यक्तींना तिने या गोळ्यांचे वाटप केले.

 

तसेच नागरिकांना कोरोना महामारी पासून संरक्षण कसे केले पाहिजे याविषयीचे सल्ले देखील दिले. स्वातीने या काळात गोरेगाव मालाड परिसरातील सुमारे 640 कुटुंबांना हे औषध मोफत वाटले.

 

एवढेच नाही तर या परिसरातील 252 पोलीस कुटुंबीयांना देखील हे औषध मोफत पुरवले. यावेळी तिच्या या कार्यात तिच्या संपूर्ण कुटुंबाने तिला भक्कम साथ दिली. पती उपेंद्र लिमये, मुलगी भैरवी लिमये तसेच संदीप भोसले, अर्जुन दळवी, आमोद दोशी या सर्वांनी तिला मदत केली.

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button