आत्ताच्या घडामोडी

हेमा मालिनी यांची भाची पाहिलीत का? दिसते खुप सुंदर; करते ‘हे’ काम

मुंबई | बॉलीवूड मधील दिग्गज अभिनेत्री हेमा मालिनी या आजही त्यांच्या कारकीर्दीतील चित्रपटांमुळे चर्चेत असतात. त्यांचा अभिनय इतका दांडगा होता की आजही अनेक प्रेक्षक त्यांचे चित्रपट आवडीने पाहतात. हेमा मालिनी यांनी बॉलीवूड चांगलं गाजवलं होतं. मात्र तुम्हाला माहित आहे का हेमा मालिनी यांना एक भाची होती आणि ती देखील बॉलीवूडमध्ये भरपूर गाजली. नव्वदच्या दशकात हेमामालिनी यांच्या भाचीने देखील अनेक चित्रपटांमध्ये काम केले.

 

हेमा मालिनी यांच्या भाचीच नाव मधु असे आहे. मधु दिसायला कमालीची सुंदर आहे. हेमा मालिनी यांचा भाऊ रघुनाथ याची मधु ही मुलगी. मधुने स्वतःच्या नावांमध्ये बदल केला आहे. मधुचं खरं नाव मधुबाला असं होतं. नंतर तिने स्वतःचे नाव बदलून सिनेसृष्टीत पदार्पण करताना मधु असं नाव ठेवलं. बॉलीवूड मध्ये तिने अनेक चित्रपटांमध्ये काम केले. मात्र तिची प्रसिद्धी फार काळ टिकली नाही. खूप कमी काळामध्ये तिला मोठी प्रसिद्धी मिळाली आणि तेवढ्याच लवकर ती सिने विश्वातून बाहेर पडली.

 

मधु तिच्या अभिनयातील कारकिर्दी विषयी बोलताना सांगते की, ” बॉलीवूड मध्ये आल्यानंतर सुरुवातीला मला बऱ्यापैकी चित्रपट मिळाले. मात्र नंतर माझ्याकडे वेगवेगळ्या गोष्टींची मागणी होऊ लागली. मी दिग्दर्शक आणि निर्मात्यांचे न ऐकल्यास मला चित्रपटातून काढून टाकले जाऊ लागले.

 

एका चित्रपटाचे तर मी चार दिवस शूटिंग केले आणि त्यानंतर त्यांनी मला त्या चित्रपटातून काढून टाकले आणि माझ्या जागी दुसरा अभिनेत्रीला घेतले. हा सर्व प्रकार माझ्यासाठी फार कठीण होता.” मधुही हेमामालिनी यांची भाची असून देखील या गोष्टीचा तिला कोणताच फायदा मिळाला नाही. बॉलीवूडमध्ये नंतर नंतर तिला चित्रपट मिळणे बंद होऊ लागेल. त्यामुळे तिने देखील सिने विश्वातून काढता पाय घेतला.

 

अभिनेत्रीने झाले 1999 मध्ये लग्न केले. जुही चावला चे पती जय मेहता यांचा चुलत भाऊ आनंद शाह याच्याशी मधूने लग्न केले. लग्नानंतर या दोघांना अमेया आणि किया अशा दोन मुली आहेत. सुरुवातीला या दोघांचा संसार फार सुखी चालला होता. यांच्यावर परिस्थितीने घाला घातला. आनंदच्या कंपनीमध्ये काम करत होता त्या कंपनीचे मोठे नुकसान झाले. त्याच्यावर भरपूर कर्ज येऊन बसले. त्यामुळे त्याला आपले राहते घर शंभर कोटींना विकून कर्ज फेडावे लागले. त्यानंतर त्याने एक साधे घर घेतले.

 

हेमा मालिनी यांची भाची असून देखील मधुला काहीच फायदा झाला नाही. आता ती तिच्या संसारात सुखी आहे. बॉलीवूडच्या झगमग्रीपासून आता ती खूप दूर गेली आहे. मात्र ती सोशल मीडियावर नेहमी सक्रिय असते. आपल्या चहा त्यांना आयुष्यातील अनेक गोष्टी शेअर करते. आजही मधून दिसायला फार सुंदर आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button