Gramin Shauchalay Yojana 2022: शौचालय बांधण्यासाठी सरकार देत आहे 12 हजार रुपये; आत्ताच करा अर्ज

Gramin Shauchalay Yojana List 2022

Gramin Shauchalay Yojana List 2022 | स्वच्छ भारत मिशन अंतर्गत ग्रामीण भागात शौचालय बांधण्यासाठी शासन 12 हजार रुपयांचे अनुदान देत आहे. या योजनेचा आत्तापर्यंत अनेक नागरिकांनी लाभ घेतला आहे. मात्र यापासून अनेक नागरिक अलिप्त राहिले आहेत. योजना सुरू केल्यानंतर मागेल त्याला शौचालय या योजनेच्या माध्यमातून देण्यात आले. (Gramin Shauchalay Yojana List 2022)

सध्या या योजनेसाठी नवीन लिस्ट सरकार जाहीर करणार आहे. तुमच्या घरी जर शौचालय नसेल तर या योजने अंतर्गत तुम्ही लगेच अर्ज करून अनुदान मागणी करू शकता. शासन तुम्हाला  पात्र करून अनुदान देईल. आणि तुम्हाला तब्बल 12 हजार रुपये एवढा फायदा होईल. या योजनेचा अनेक नागरिकांनी पूरेपूर फायदा घेतला आहे. आज आपण या योजनेची पूर्ण माहिती जाणून घेणार आहोत.

स्वच्छ भारत अभियानाच्या अंतर्गत सरकारने ही नवीन योजना सुरू केली आहे. ग्रामीण भागात उघड्यावर शौचास जाऊन अस्वच्छता आणि रोगराई पसरत आहे. यामुळे नागरिकांना याचा नाहक त्रास देखील सहन करावा लागत आहे. यामुळे स्वच्छ भारत अभिनयाच्या अंतर्गत ही योजना सुरू करण्यात आली आहे. आत्तापर्यंत अनेक नागरिकांनी या योजनेचा लाभ घेतला आहे.

Advertisement

या योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्जदाराला जास्त कागदपत्राची आवश्यकता पडणार नाही. फक्त आधार कार्ड आणि बँकेचा तपशील या मध्ये द्यावा लागेल. यापेक्षा जास्त माहिती द्यावयाची आवश्यकता नाही. तसेच या योजनेसाठी ऑनलाईन मोबाईल किंवा computer वरून नोंदणी करावी लागणार आहे. त्यामुळे घरी बसून अर्ज करता येणार आहे.

• असा करा अर्ज (Online Application) –
  1. प्रथम तुम्ही तुमचे ब्राऊझर ओपन करा.
  2.  त्यानंतर त्यामध्ये https://sbm.gov.in/sbm_dbt/secure/login.aspx ही वेबसाइट टाकून वेबसाइटवर जा.
  3.  सर्च केल्यानंतर तुमच्या समोर 2 opstion दिसतील. 1) Swachh Bharat Mission Phase 2 आणि 2) swachh Bharat Mission (G) असे दोन इंटरफेस तुमच्या समोर येतील.
  4.  त्यानंतर तुम्हाला Citizen New Registation असा एक पर्याय दिसेल. त्यावर क्लिक करा.
  5.  या योजनेचा नोंदणी करण्याचा Registration Form समोर ओपन होईल.
  6.  त्यामध्ये तुमचा चालू मोबाईल नंबर टाका.
  7.  तुमचे व्यवस्थित नाव टाका.
  8.  तुमचे लिंग टाका, उ. स्री / पुरुष
  9.  तुमच्या घराचा पत्ता व्यवस्थित टाका.
  10.  त्यानंतर खाली CAPTCHA कोड असेल. तो व्यवस्थीत टाका.
  11.  आणि अर्ज सबमिट करा.
• वरील माहिती भरल्यानंतर तुम्हाला मूळ अर्ज करता येणार आहे.
  1.  प्रथम तुम्ही login या बटनावर क्लिक करा.
  2. तुम्ही जो वर दिला आहे. तो मोबाईल नंबर टाका.
  3. पासवर्ड म्हणून मोबाईलचे शेवटचे 4 अंक टाका.
  4. CPATCHA कोड टाकून लॉगिन या बटणावर क्लिक करा.
• वरील प्रमाणे तुम्ही लॉगिन केल्यानंतर तुम्हाला खालील प्रमाणे तीन पर्याय दिसतील.
  • New Application
  • View Application
  • Change Password

यामधील New Application या पर्यायावर क्लिक करा. त्यानंतर तुमच्या स्क्रीनवर एक अर्ज ओपन होईल. त्यात खालील प्रमाणे माहिती भरा.

Advertisement

 

हे पण वाचा – कर्ज घेतल्यानंतर कर्जदाराचा मृत्यू झाल्यास बँक कोणाकडून कर्ज वसूल करते?

• IHHL Application Form यामध्ये खालील माहिती भरा.
  1.  State Name असे असेल त्यामध्ये Maharashtra निवडा.
  2. District साठी तुमचा जिल्हा निवडा.
  3. Block Name असा पर्याय असेल त्यात तालुका टाका.
  4. पंचायत निवडा.
  5. तुमचे गाव निवडा.
  6. तुमच्या गावातील वाडी निवडा.
    वरील सर्व व्यवस्थीत भरल्यानंतर तुम्हाला खाली शौचालय मालकाची माहिती भरायची आहे.

 

• B साठी शौचालय मालकाची माहिती भरा.
  1. मालकाचे आधारकार्डवर असलेले नाव टाका.
  2.  आधार क्रमांक टाका.
  3. नातेवाईकांचे नाव टाका.
  4. लिंग निवडा.
  5. पोट जात निवडा.
  6. APL किंवा BPL असे दोन पर्याय दिसतील. त्यातील एक पर्याय निवडा.
  7.  तुमचा चालू मोबाईल नंबर व्यवस्थीत टाका.
  8.  ईमेल आयडी व्यवस्थित टाका.
  9.  तुमचा संपूर्ण पत्ता व्यवस्थित टाका.
    त्यानंतर तुम्हाला आता तुमच्या बँकेची माहिती विचारली जाईल. ती व्यवस्थित भरून घ्या.
• बँकेची संपूर्ण माहिती (Bank Daitails) –
  1. बँकेचा IFSC कोड टाका.
  2.  दोन वेळा बँकेचा खाते क्रमांक टाका.
  3.  बँकेच्या पासबुकचां फोटो स्कॅन करून अपलोड करा.
  4.  माहीती भरून Apply या बटणावर क्लिक करा.
  5.  आणि तुम्हाला Your application submit successfully kindly note the application no. असे दिसेल. म्हणजे तुमचा अर्ज व्यवस्थित पाठवला गेला आहे. तुम्हाला जो अर्ज नंबर दिला आहे. तो व्यवस्थित सेव्ह करून ठेवा.
हे पण वाचा – ट्रॅक्टर खरेदीवर सरकार देतय 50 टक्के अनुदान; लगेच करा अर्ज
• अर्जाची स्थिती जाणून घ्या. (Online Application Status)
  1.  तुमच्या स्क्रीनवर डाव्या बाजूला View Application असा पर्याय दिसेल. त्यावर क्लिक करा.
  2.  त्यानंतर तुम्हाला सिरियल नंबर, अर्ज नंबर टाकावा लागेल.
  3.  त्यानंतर Track Status या पर्यायावर क्लिक करा.
  4.  क्लिक केल्यानंतर लगेच तुम्हाला तुमच्या अर्जाची स्थिती समजेल.
  5.  जर तुम्हाला अर्ज करता आला नाही तर जवळच्या महाईसेवा केंद्र किंवा CSC सेंटरमध्ये जाऊन अर्ज भरा.

येथे क्लिक करून करा अर्ज.

पूर्ण बातमी वाचा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *