आत्ताच्या घडामोडी

गोविंदाची मुलगी दिसते खूपचं सुंदर आणि हॉट; करते ‘हे’ काम

मुंबई | हिंदी चित्रपट सृष्टीतील प्रसिध्द अभिनेता गोविंदा आहुजा तुम्हाला माहीतच असेल. त्याने शेकडो चित्रपटात भूमिका साकारून करोडो चाहत्यांच्या मनावर राज्य केलं आहे. गोविंदाच बालपण खूपचं हास्य जनक होत. तो जन्मल्यापासून विनोदी कलाकार होता.

 

शाळेत असताना, नाटकात भाग घेतल्याने त्याला अभिनय क्षेत्राची चटक लागली आणि त्याने अभिनय क्षेत्रात पाऊल टाकले, सुरुवातीला त्याला छोट्या पडद्यावर काम करण्याची संधी मिळाली. त्यानंतर हळूहळू त्याला मोठे चित्रपट मिळू लागले.

 

आणि तो हिंदी चित्रपटात नावा रूपाला आला. त्याचे अनेक चित्रपट हिट झाले आहेत. त्यात कुली नं – 1, नसीब, राजाबाबु, दुल्हे राजा असे अनेक चित्रपट त्याचे हिट होऊन गेले आहेत. गोविंदा हा अभिनय नाही तर राजकारणात देखील सक्रिय होता.

 

तो खासदार म्हणून देखील निवडून आला आहे. गोविंद याच्या बद्दल अनेकांना जाणून घेण्याची इच्छा असते. आज आम्ही तुम्हाला त्याच्या आयुष्यातील काही गोष्टी सांगणार आहोत. गोविंदाच्या मुलीचे नाव नर्मदा आहुजा आहे.

 

तिला टिना म्हणून देखील ओळखले जाते. ती देखील एक अभिनेत्री आहे. तिने बोटावर मोजता येतील एवढ्या चित्रपटात भुमिका साकारली आहे. टिना ही सेकंड हॅण्ड हसबंड या चित्रपटाने प्रकाश झोतात आली होती. त्यानंतर ड्रायव्हिंग मी क्रेझी या चित्रपटात देखील ती दिसली होती.

 

मात्र त्यानंतर ती कोणत्या दिग्गज चित्रपटात दिसली नाही. मात्र सोशल मीडियावर ती कायम चर्चेत असते. ती कायम बोल्ड फोटो शूट करून चाहत्यांना घायाळ करताना दिसते. येत्या काळात ती मोठ्या पडद्यावर झळकणार असल्याची माहिती समोर येत आहे.

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button