Good News | आलिया नंतर कतरिना कैफ कडून खुशखबर; लवकरच देणार बाळाला जन्म?

दिल्ली | बॉलिवूडमध्ये बऱ्याच दिवसांपासून एक बातमी समोर येत आहे ती म्हणजे आलिया भट्टनंतर आता कतरिना कैफही आई होणार आहे. गेल्या अनेक दिवसांपासून असा अंदाज लावला जात आहे की, अभिनेत्रीला तिच्या प्रेग्नेंसीची बातमी माध्यमांसमोर आणायची नाही. त्यामुळे ती माध्यमांपासून दूर आहे. सोशल मीडियावर कतरिना कैफ प्रेग्नंट असल्याची बातमी आल्यापासून काही लोक या बातमीच्या बाजूने आहेत. अनेक जण या बातमीचे स्वागत करत आनंद व्यक्त करत आहेत. तर काही व्यक्ती याला केवळ अफवा असल्याचे समजत आहेत.

 

लग्न झाल्यापासून कॅटरीना सोशल मीडियावर फार सक्रिय नसते. शेवटची ती करण जोहरच्या 50 व्या वाढदिवसाच्या पार्टीत दिसली होती. तिने आणि विकीने गेल्या वर्षी 9 डिसेंबर 2021 रोजी राजस्थानमधील सिक्स सेन्स फोर्टमध्ये लग्न केले. दोघांच्या लग्नाच्या बातमीने चाहत्यांना एक सुखद धक्का बसला. लवकरच ती सलमान खानसोबत ‘टायगर 3’ मध्ये दिसणार आहे.

 

मात्र आता तिने ही गुड न्यूज तिच्या सोशल मीडिया अकाऊंटवरून दिली आहे. कॅटरीनाने तिच्या सोशल मीडिया अकाऊंटवर एक पोस्ट शेअर करत ही गोड बातमी दिली आहे. विशेष म्हणजे आनंदाच्या भारत तिने तारीख देखील सांगितली आहे. कोणत्या तारखेला तिची गोड बातमी सगळ्यांना पाहायला मिळणार आहे हे देखील तिने चाहत्यांना सांगितलं आहे. तिच्या या गोड बातमीमुळे चाहते भारावून गेले आहेत.

 

कतरीना कडे एवढ्या लवकर गोड बातमी असल्याने आता चात्यांच्या आंदला पार उरलेला नाही. सर्व जण खूप खुश आहेत. ही गोड बातमी तिच्या आगामी चित्रपटाची आहे. कॅटरीनाने तिच्या आगामी चित्रपटाची माहिती देत त्याची तारीख देखील शेअर केली आहे. कॅटरीना भूत फोन या आगामी चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. अभिनेता सिद्धार्थ मुख्य भूमिकेत दिसणार आहे. तसेच इशान खट्टर देखील दमदार भूमिका साकारणार आहे.

 

कॅटरीनाने याच भूत फोन चित्रपटाचा एक पोस्टर तिच्या इंस्टाग्राम अकाउंटवर शेअर करत लिहिल आहे की, ” भूत फोनच्या या दुनियेत तुमचे स्वागत आहे. 7 ऑक्टोबर 2022 रोजी चित्रपट प्रदर्शित होईल.” गेल्या अनेक दिवसांपासून चाहते तिच्या आगामी चित्रपटाची वाट पाहात होते. तसेच टायगर ३ या चित्रपटाची देखील प्रेक्षक वाट पाहत आहेत. अशात आता फरान अख्तर निर्मित भूत पुलिस हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर किती कमाई करू शकेल हे पाहणं औत्सुक्याचे ठरणार आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button