Goat Farm Subsidy | राज्यातील अनेक शेतकरी सध्या अडचणींचा सामना करत आहेत. शेतकऱ्यांच्या पिकाला योग्य भाव मिळत नाही, आणि त्यामुळे शेतकरी वर्ग कर्जाच्या विळख्यात आडकला जात आहे. मात्र शेतकऱ्यांनी आर्थिक दृष्ट्या मजबूत व्हाव यासाठी राज्य सरकार कडून अनेक मोठ्या योजना वारंवार राबविल्या जातात. याचा फायदा शेतकऱ्यांना होत असतो, मात्र संबंधित योजनेचा लाभ मिळविण्यासाठी लागणारी परिपूर्ण माहिती शेतकऱ्यांना मिळत नाही. आज आम्ही तुम्हाला या लेखाच्या माध्यमातून या योजनेची परिपूर्ण माहिती देण्याचा प्रयत्न करणार आहे.
राज्यातील शेतकरी आर्थिक दृष्ट्या सक्षम बनावा यासाठी राज्य सरकारच्या कृषी विभागाकडून १ लाख ३ हजार ५४५ रुपयांपर्यंतचे अनुदान शेतकऱ्यांना दिले जाणार आहे. शेतीला जोडधंदा म्हणून या योजनेचा लाभ घेऊन शेतातील एका कोपऱ्यामध्ये शेळी पालन व्यवसाय सुरू केला जाऊ शकतो. शेळी हे जनावर शेतातील गवत व न उपयोगी येणाऱ्या पिकांवर आपला उदरनिर्वाह करू शकते. शेळी पालन व्यवसायासाठी शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात रक्कम गुंतवावी लागत नाही. व्यवसाय छोट्या स्वरूपात सुरू करावा, सुरुवातीला मिळालेला नफा त्याच व्यवसायात गुंतवावा, यामुळे तुमचा व्यवसाय झटपट वाढेल. आणि तुमच्या उत्पन्नात मोठी वाढ होऊ शकते. यामुळे शेतीला जोडधंदा म्हणून देखील तुम्ही याकडे पाहू शकता.
शेळी पालन व्यवसायातून तुम्ही मांस आणि दुधाची विक्री करून मोठी कमाई करू शकता. तुमच्या परिसरातील हॉटेल व्यावसायिकांना याची विक्री सहजा सहजी केली जाऊ शकते. त्याच सोबत तुमच्या परिसरात जे मटण स्टॉल असतात, त्या ठिकाणी देखील चांगल्या भावात वाढवलेल्या शेळ्यांची विक्री केली जाऊ शकते. शेळी पालन व्यवसाय हा कृषी अभ्यासकांच्या म्हणण्यानुसार ६ महिन्यांचा लॉट असतो. तुम्ही या योजनेतून शेळी खरेदी केल्यानंतर काही दिवसांनंतर शेळ्यांची संख्या वाढते, आणि छोट्या प्रमाणात सुरू केलेल्या या व्यवसायाला मोठे स्वरूप प्रदान होते.
ही योजना काय आहे? मूळ समजून घेऊ (Goat Farm Subsidy)
या योजनेतील प्रत्येक महिला शेतकऱ्याला १० शेळ्या आणि १ बोकड खरेदी करण्यासाठी शासन अनुदान देते. त्यासोबतच जर मेंढ्या खरेदी करायच्या असतील तर १० मेंढ्यांमागे १ मेंढा गट खरेदी करण्यासाठी शासनाकडुन अनुदान दिले जाते. या अनुदानाची रक्कम फिक्स असते. जर तुम्ही शेळ्यांमध्ये उस्मानाबादी किंवा संगमनेरी जातीची खरेदी केली तर अनुदान जास्त दिले जाते. आणि तुम्ही जर तुमच्या ग्रामीण भागातील स्थानिक जातींच्या शेळ्यांची खरेदी केली तर अनुदानाची रक्कम कमी दिली जाते. म्हणजेच उस्मानाबादी आणि संगमनेरी या जातींसाठी तुम्ही जर इतर कोट्यांमध्ये मोडत असाल तर ७५ टक्के अनुदान तुम्हाला शासनाकडुन दिले जाते. आणि तुम्ही सर्वसाधारण मध्ये असाल तर ५० टक्के पर्यंत अनुदान या योजनेच्या माध्यमातून तुम्हाला दिले जाते. (Shelipalan Anudan Yojana 2026)
मंजूर झालेल्या अनुदानातीन उर्वरित रक्कम तुम्ही बँकेतून कर्ज किंवा स्वतः कडे असलेली रक्कम गुंतवून हा व्यवसाय सुरू करू शकता. या योजनेमध्ये धनगर आणि सत्यम जातींना प्राधान्य दिले जात आहे. त्यानंतर महिला बचत गटासाठी देखील या योजनेला प्राधान्य दिले जात आहे. जर तुम्ही महिला बचत गटाच्या सदस्य असाल तर या योजनेचा लाभ तात्काळ तुम्हाला मिळू शकतो. राज्यातील अनेक महिला गटांनी या योजनेचा लाभ घेऊन महिलांना आणि आर्थिक दृष्ट्या कमकुवत शेतकऱ्यांना एक चांगला जोडधंदा उपलब्ध करून दिला आहे.
या योजनेची जात निहाय अनुदान आकडेवारी
अनुसूची जाती जमातीसाठी उस्मानाबादी किंवा संगमनेरी शेळी खरेदीसाठी ७७ हजार ६५९ रुपय रक्कम अनुदान स्वरूपात देण्यात येणार आहे. जर तुम्ही शेळ्यांमधिल स्थानिक जातीची निवड केली तर तुम्हाला ५८ हजार ६७३ रुपयांपर्यंत अनुदान दिले जाणार आहे. तुम्ही जर मेंढ्यांसाठी अर्ज केला तर माडग्याळ या मेंढ्यांच्या जातीसाठी ९३ हजार ६३८ रूपये अनुदान शासनाकडुन दिले जाऊ शकते. आणि त्यातील दख्खनी किंवा स्थानिक जाती मधील मेंढ्यांची खरेदी केली तर शासनाकडुन या योजनेच्या माध्यमातून ७७ हजार ६८९ रुपये अनुदान दिले जाऊ शकते. (maharashtra shelipalan subsidy 2026)
सर्वसाधारण प्रवर्गासाठी दिले जाणारे अनुदान
जर तुम्ही शेळी पालनासाठी उस्मानाबादी किंवा संगमनेरी या जातीच्या शेळींची खरेदी केली तर तुम्हाला ५१ हजार ६७३ रुपयांपर्यंतचे अनुदान या योजनेच्या माध्यमातून दिले जाईल तर स्थानिक जातींच्या शेळींची खरेदी केली तर ३९ हजार ११६ रुपये शासनाकडुन अनुदान दिले जाईल. जर तुम्ही मेंढ्यांची खरेदी करणार असाल तर माडग्याळ या जातीच्या खरेदीसाठी ६४ हजार ४२५ रुपयांपर्यंतचे अनुदान दिले जाणार आहे. आणि तुम्ही जर दख्खन किंवा गावठी जातीच्या मेंढ्यांची खरेदी केली तर ५१ हजार ७७३ रुपये तुम्हाला शासनाकडुन अनुदान दिले जाऊ शकते.
या योजनेच्या नियम व अटी सविस्तर
- जो शेतकरी या योजनेसाठी अर्ज करणार आहे, तो महाराष्ट्र राज्यात वास्तव्यास असावा. म्हणजे तो महाराष्ट्राचा रहिवासी असावा.
- या पूर्वी इतर किंवा या योजनेतून लाभ घेऊन शेळी किंवा मेंढी पालन व्यवसाय केलेला नसावा.
- या योजनेच्या माध्यमातून एका कुटुंबातील फक्त एकाच व्यक्तीला लाभ दिला जातो. इतर सदस्यांना याचा लाभ घेता येणार नाही.
- या योजनेतून अनुदान मिळविण्यासाठी अर्जदार व्यक्तीला स्वतःची जागा आणि शेळ्यांच्या चाऱ्याची व्यवस्था करावी लागणार आहे.
- या योजनेमध्ये अर्ज करणाऱ्या व्यक्तीचे वय १८ पासून ते ५५ वर्षांच्या आत असणे अनिवार्य आहे.
- जर मागील ५ वर्षांमध्ये शासनाच्या पशुसंवर्धन विभागाच्या इतर योजनांचा लाभ तुम्ही घेतला असेल तर तुमचा अर्ज नामंजूर केला जातो.
- शेळी पालन किंवा मेंढी पालन व्यवसाय करण्यासाठी अधिकृत संस्थेत जाऊन तुम्ही प्रशिक्षण पूर्ण केलेले असावे.
- तुमच्याकडे जर योजनेत अर्ज करण्यापूर्वी शेळी किंवा मेंढ्या उपलब्ध असतील तर तुम्हाला या योजनेतील अनुदानासाठी प्रथम प्राधान्य दिले जाणार आहे.
- जे अर्जदार अनुसूची जाती जमातींमधून अर्ज करत आहेत त्यांच्याकडे जात प्रमाणपत्र असणे बांधणकरण आहे.
या योजनेसाठी लागणाऱ्या महत्वाच्या कागदपत्रांची यादी
- शेतकरी ओळखपत्र (Farmer ID)
- अर्जदाराचे आधार कार्ड (Aadhar Card)
- अर्जदाराचे पॅनकार्ड (pancard)
- ग्रामपंचायत व्यवसाय परवाना (NOC)
- अर्जदाराचे रहिवासी प्रमाणपत्र
- अर्जदाराने प्रशिक्षण पूर्ण केलेले प्रमाणपत्र
- अर्जदाराचा पासपोर्ट साईज फोटो
- अर्जदाराचे रेशनकार्ड (Ration Card)
- अर्जदाराचे वीजबिल (Light Bill)
- अर्जदाराचे योजनेसाठी हमीपत्र
अर्ज कसा करावा
संबंधित अर्ज हा महाराष्ट्र शासनाच्या अधिकृत संकेतस्थळावर जाऊन केला जाऊ शकतो किंवा जर अर्ज ऑफलाईन करायचा असेल तर गावातील ग्रामपंचायत कार्यालय, कृषी विभाग कार्यालय किंवा जिल्हा कार्यालयात सर्व कागदपत्र जमा करून अर्ज करू शकता.
| Krishi Vibhag | VISIT NOW |
| Pashusanvardhan vinhag | VIEW NOW |
टीप – संबंधित योजना ही राज्य सरकारच्या कृषी विभाग आणि पशू संवर्धन विभागाच्या माध्यमातून चालवली जाते. जर या योजनेसाठी अर्ज करण्याची मुदत म्हणजेच जर सरकारचे टार्गेट पूर्ण झाले तर योजनेत अर्ज करण्यासाठी काही दिवस बंद केले जाते. नवीन आर्थिक वर्षात पुन्हा अर्ज करण्याची संधी शासनाच्या माध्यमातून उपलब्ध करून दिली जाते. त्यामुळे नवीन आर्थिक धोरण येईपर्यंत या योजनेत अर्ज करणे काही जिल्ह्यांसाठी बंद असू शकते. तुम्ही संबंधित कार्यालयात जाऊन चौकशी करा जर अर्ज घेणं बंद करण्यात आले असेल तर थोड्या दिवस वाट पाहावी.







