Free Flour Mill Yojana: प्रत्येकाला मिळणार मोफत पिठाची गिरण; लगेच करा अर्ज

Free Flour Mill Yojana Maharashtra 2022 | राज्य आणि केंद्र सरकार कडून महिला आणि नागरिकांसाठी अनेक योजना राबविल्या जात आहेत. या योजनांमुळे महिलांना तसेच नागरिकांना मोठा फायदा मिळत आहे. आज आपण अशाच एका योजने बद्दल माहिती घेणार आहोत. या योजनेच्या अंतर्गत महिलांना अनुदानावर पिठाच्या गिरणीचे वाटप केले जाते. (Mofat pithachi giran yojana Maharashtra 2022)

Join WhatsApp Group

 

महिलांनी स्वलंबी होऊन त्यांना रोजगार मिळावा या हेतूने ही योजना सुरू करण्यात आली आहे. पंचायत समितीच्या अंतर्गत ही योजना चालविली जाते. या योजनेचा आत्तापर्यंत अनेक महिलांनी फायदा घेतला आहे. आज आपण या योजनेसाठी लागणारी कागदपत्रे तसेच कोण पात्र आहे. याबाबत माहिती जाणून घेणार आहोत. चला तर वाचू सविस्तर माहिती. (Pithachi giran yojana anudan 2022)

 

पिठाची गिरणी अनुदान योजनेसाठी लागणारी कागदपत्रे (Documents list) –

  • आधार कार्ड
  • 12वी पास सर्टिफिकेट
  • घराचा 8अ उतारा
  • बँक पासबुक
  • लाईट बिल
  • उत्पन्नाचा दाखला
  • पासपोर्ट फोटो

 

नियम व अटी –

  • योजनेचा अर्जदार महिला असावी.
  • अर्जदार हे महाराष्ट्रातील रहिवासी असावेत.
  • अर्जदाराचे वय 18 ते 60 वर्ष असावे.
  • अर्जदाराच्या कुटुंबाचे उत्पन्न 1 लाख 20 किंवा त्याहून कमी असावे.
  • ग्रामीण किंवा शहरी भागात रहिवासी असावे.

 

अर्ज कसा करावा (How to Apply) –

  • या योजनेसाठी तुम्ही वरील बाबींमध्ये पात्र असावे.
  • अर्ज हा ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे.
  • खाली दिलेल्या लिंकवरून अर्ज डाउनलोड करा.
  • त्याची एक झेरॉक्स काढा.
  • त्यानंतर सर्व माहिती व्यवस्थित भरा.
  • त्यासोबत कागदपत्रे व्यवस्थित जोडा.
  • तुमच्या तालुक्याच्या ठिकाणी महिला व समाज कल्याण विभागात जाऊन या योजनेची पूर्ण माहिती घेऊन अर्ज द्या.
  • किंवा ग्रामपंचायत, पंचायत समिती आणि जिल्हा परिषदेच्या कार्यालयात जाऊन भेट द्या.

क्लिक करून सदर योजनेचा अर्ज डाउनलोड करा.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button