आधी झाला उलट्यांचा त्रास नंतर ८ वर्षीय चिमुकलीचा दुर्दैवी अंत; वाचून डोळ्यात पाणी येईल

जळगाव: गेल्या काही दिवसापासून लहान मुलांचे निरनिराळ्या कारणामुळे मृत्यूचे प्रमाण वाढले आहे. जळगावमधील रामपेठ भागात एका मुलीला झोपेत उलटी झाली. उलटी घशात अडकल्यामुळे आठ वर्षांच्या चिमुकलीचा मृत्यू झाल्याची दुर्देवी घटना शुक्रवारी दुपारी घडली. अनुष्का मुकेश भोई (जावरे) (वय-८) असे मयत या घटनेत मृत पावलेल्या मुलीचे नाव आहे. जावरे कुटुंबतील अनुष्का ही एकुलती एक मुलगी होती.
जळगाव मधील जुने जळगाव या भागात भोईवाड्यातील रामपेठमध्ये मुकेश एकनाथ जावरे व अलका मुकेश जावरे हे आपल्या आठ वर्षांची मुलगी अनुष्का हिच्यासोबत राहत आहेत. अनुष्का भोई ही जळगाव मधील महापालिकेच्या शाळा क्रमांक ३ मध्ये सिनियर केजी या वर्गात शिक्षण घेत आहे. अनुष्का शुक्रवारी सकाळी नेहमीप्रमाणे शाळे मध्ये गेली होती. शाळा सुटल्यानंतर ती दुपारी घरी आली. अनुष्काने शाळेतून घरी आल्यानंतर आपली तब्येत ठीक नसल्याचे सांगितले. अनुष्काच अंग गरम असल्याने, तिला ताप असावा म्हणून अनुष्काची आई अलका यांनी अनुष्काला झोपी घालण्याचा प्रयत्न केला.
अनुष्का ही नेहमी प्रमाणे शाळेत गेली आणि परतली तेव्हा कुणालाही असे काही घडेल, असे वाटले नव्हते. परंतु, काही वेळात अनुष्काची उटली झाली आणि प्रकृती जास्त बिघडली आणि अनुष्का वर उपचार करण्यापूर्वीच तिचा मृत्यू झाला. अनुष्का ही भोई कुटुंबातील एकुलती एक मुलगी होती. अनुष्काचे वडील जळगाव मधील एमआयडीसीतील एका खाजगी कंपनीत नोकरीला आहेत.
अनुष्का ही अत्यंत हुशार मुलगी असल्याने तसेच खूपच बोलकी होती, यामुळे रामपेठमधील प्रत्येकजण तिला ओळखत होता. अनुष्का कुटुंबाप्रमाणेच संपूर्ण गल्लीतील रहिवाशांची त्याचबरोबर शाळेतील शिक्षकांचीही ती खूपच लाडकी होती. एकुलत्या एक मुलीचा अचानक मृत्यू झाल्यामुळे अनुष्काच्या आई-वडीलांना मोठा मानसिक धक्का बसला आहे. या घटनेने रामपेठ परिसर सुध्दा शांत पडला आहे. या घटनेमुळे सर्वत्र परिसरातून हळहळ व्यक्त केली जात आहे.