आधी आजोबांनी सोडले प्राण आणि काळातच नातूचाही झाला मृत्यू; वाचून डोळ्यात पाणी येईल

जळगाव : गेल्या काही दिवसापासून बिबट्याची दहशत महाराष्ट्रात पसरली आहे.आजोबांचे निधन झाले त्यामुळे आई वडील हे त्यांची अंत्यविधी करण्यासाठी गावाला गेली असताना घरी थांबलेल्या मुलावर बिबट्याने हल्ला केला. बिबट्याने हल्ला केलेल्या मृत मुलाचे नाव सुजित दिगंबर पाटील असे आहेत. सकाळच्या वेळी तो शौचालय करण्यासाठी शेतामध्ये गेला होता.
त्यावेळी पाठीमागून बिबट्याने त्याच्यावर हल्ला केला आणि सुजितला फरपटत शेतामध्ये घेऊन गेला. अंत्यविधी करण्यासाठी गेलेले आई-वडील संध्याकाळच्या वेळी घरी परतले तेव्हा त्यांना सुजित घरी दिसला नाही. सगळीकडे शोधाशोध करून त्यांना कुठेही सापडला नाही. त्यावेळी त्यांनी मोबाईलचे लोकेशन लावले. सुजितच्या मोबाईलचे लोकेशन हे उसामध्ये लागले.
सर्वे तालुका पाचोरा या ठिकाणी आज सकाळी ही घटना उघडकीस आली. दिगंबर पाटील हे सर्वे या गावी आपला उदरनिर्वाह शेतीवर करत आहेत. दिगंबर पाटील यांना सुजित हा एकुलता एक मुलगा आहे. पाटील यांच्या मोठ्या मुलीचे लग्न झालेले आहे.
गेल्या काही दिवसांपूर्वी सुजितच आजोबा हे आजारी होते. परवा त्यांचा मृत्यू झाला त्यामुळे सुजितचे आई वडील हे आजोबांची माती करण्यासाठी गेले होते. ते मातीला गेले असल्यामुळे घरी सुजित हा एकटाच होता. बुधवारी सकाळी सुजित हा शौचालयासाठी शेतात गेला असताना त्याच्यावर पाठीमागून बिबट्याने हल्ला केला. बिबट्याने हल्ला करून सुजित ला उसामध्ये फरफडत घेऊन गेला.
मोबाईल लोकेशन वरून सुजित चा लागला शोध – सुजीतचे आई वडील अंत्ययात्रेवरून घरी आले त्यावेळी त्यांना त्यांच्या घराचे कुलूप लावलेले दिसले. मुलाच्या मोबाईलवर फोन लावला परंतु फोनला रिप्लाय आला नाही. फोन न उचलल्यामुळे त्यांनी सर्वत्र शोधाशत सुरू केली.परंतु सुजित त्यांना कुठेही दिसला नाही. त्यामुळे सुजीतच्या आई वडिलांनी रात्री उशिरा पोलिसांमध्ये तक्रार दिली.
त्यानंतर पोलिसांनी सूजितच्या मोबाईलचे लोकेशन लावले. त्यावेळी त्यांना पाचशे मीटर अंतरावरच मोबाईल असल्याचे दिसून आले. पोलिस आणि नागरिक लोकेशन च्या दिशेने उसामध्ये गेले त्यावेळेस मोबाईल आणि सुजित चा मृतदेह आढळून आला. त्यानंतर वन्य प्राण्याने हल्ला केल्याचे. वनविभागाच्या पथकाने तेथे येऊन पंचनामा केला त्यावेळी हल्ला केल्या असल्याचे वर्तवण्यात आले. सुजित च्या मृत्यूमुळे पाटील कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. बिबट्याने हल्ल्यामुळे संपूर्ण नागरिकांमध्ये दहशत पसरली आहे.