आधी आईचे निधन अन् आता महेश बाबूवर मोठं संकट; घडली धक्कादायक घटना

दिल्ली | स्टार कलाकार महेश बाबू सध्या मोठ्या दुःखाचा सामना करत आहे. तो सध्या खूप मोठ्या दुःखात आहे. कारण आत्ताच त्याच्या आईचे निधन झाले आहे. त्यामुळे तो पुरता खचून गेला आहे. मात्र आईचे निधन झाल्या नंतर आणखी एका धक्कादायक घटनेनं परिवारात भीतीचे वातावरण पसरले आहे.

Join WhatsApp Group

 

महेश बाबू हा साऊथ चित्रपट सृष्टीतील एक स्टार अभिनेता आहे. त्याने आत्तापर्यंत 100हून अधिक चित्रपटात काम केले आहे. तो खूप महागडा अभिनेता आहे. तो चित्रपट करण्यासाठी सर्वात जास्त मानधन घेतो. मात्र त्याचे सर्वच चित्रपट ब्लॉगबस्टर ठरले आहेत.

 

नुकतेच त्याच्या आईचे निधन झाले आहे. त्यातून तो सावरण्याचा प्रयत्न करतोय मात्र आणखी एका घटनेनं महेश बाबू ला मोठा धक्का बसला आहे. तसेच त्याच्या परीवारामध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. घडलेल्या घटनेची पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे.

 

महेश बाबू घरात नव्हता, यावेळी रात्रीच्या वेळी त्याच्या घरात एक चोर शिरला, एका उंच भिंतीवरून उडी मारून चोरट्याने घरात प्रवेश केला. मात्र घरात असलेल्या सुरक्षा रक्षकाने चोराला पाहिले आणि त्याला पकडले. दोघात चकमक झाली. यात चोर जखमी झाला. ज्युबली हिल्स येथील पोलिसांना सदर घटना तात्काळ सांगण्यात आली.

 

पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी येत चोराला ताब्यात घेतले. त्यापूर्वी सदर चोराला जवळच्या रुग्णालयात उपचार करण्यासाठी नेण्यात आले. आणि त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला. चोराचा प्लॅन फसला मात्र याचा मनस्ताप महेश बाबू याला झाला. त्याला याबाबत कल्पना देण्यात आली तेव्हा त्याला देखील धक्का बसला. त्याने परिवारातील सदस्यांना आधार देण्याचं काम देखील केलं आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button