चित्रपटसृष्टी हादरली! ऑस्कर पुरस्कार विजेत्या अभिनेत्रीचे निधन; 200हून अधिक चित्रपटात साकारली होती भूमिका, झोपेतच घेतला अखेरचा श्वास

दिल्ली | गेल्या काही दिवसांपासून अभिनय क्षेत्रातील अनेक दिग्गज मान्यवर जगाचा निरोप घेत आहेत. मराठी चित्रपट सृष्टी तसेच बॉलिवूड मधील अनेक कलाकार आपल्याला सोडून जात आहेत. 2021 आणि 2022 या दोन वर्षात अनेक कलाकारांनी जगाचा निरोप घेतला आहे. न भरून येणारी पोकळी या 2 वर्षात निर्माण झाली आहे.

Join WhatsApp Group

लता मंगेशकर, बप्पी लहरी, रमेश देव, केके या दिग्गज मान्यवरांनी या वर्षात जगाचा निरोप घेतला आहे. यामुळे अभिनय क्षेत्राला एक मोठी पोकळी निर्माण झाली आहे. कला विश्वाला कोणाची नजर तर लागली नाही ना? असा सवाल व्यक्त केला जात आहे. मात्र अजून देखील कलाकारांच्या मृत्यु च्या घटनांमध्ये वाढ होत आहे.

ऑस्कर पुरस्कार विजेत्या एका दिग्गज अभिनेत्रीच्या निधनाने पूर्ण हॉलिवुड हादरलं आहे. बॉलीवुड आणि साऊथ चित्रपट सृष्टी प्रमाणे हॉलिवुड मधील देखील कलाकार जगाचा निरोप घेत आहेत. त्यामुळे अभिनय क्षेत्राला मोठा धक्का बसला आहे.

200 हून अधिक चित्रपटात भूमिका साकारून करोडो चाहत्यांच्या मनावर राज्य करणारी हॉलिवुड मधील प्रसिध्द अभिनेत्री लुईस फ्लेचर यांचे निधन झाले आहे. त्यांच्या निधनाने करोडो चाहत्यांच्या भावना दुखावल्या आहेत. त्यांनी अनेक दिग्गज चित्रपटात भूमिका साकारली होती.

त्यांना अनेक चित्रपटांमध्ये केलेल्या उत्कृष्ट अभिनयामुळे अनेक पुरस्कार मिळाले आहेत. त्यांनी रात्री झोपेत असताना अचानक त्यांची प्रकृति बिघडली आणि त्यात त्यांचे निधन झाले आहे. वयाच्या 88 व्या वर्षी त्यांनी जगाचा निरोप घेतला आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button