चित्रपटसृष्टी हादरली! प्रसिद्ध कलाकाराचे निधन; हृदयविकाराचा आला होता झटका
मुंबई | मनोरंजन विश्वातून काळीज पिळवटून टाकणारी बातमी समोर येत आहे. एका प्रसिद्ध गायिकेने या जगायचा निरोप घेतला आहे. या अभिनेत्रीने अनेक भाषांमध्ये गाणी गायलेली आहेत. त्यांच्या गाण्यांवरती अनेक जण दिवाने व्हायचे. काही दिवसांपूर्वी अभिनेते मिथिलेश चतुर्वेदी यांनी देखील या जगाचा निरोप घेतला. त्यांच्या निधनाने अजूनही बॉलीवूड हळहळ व्यक्त करत आहे.
निखिलेश चतुर्वेदी हे एक हरहुन्नरी अभिनेते होते. त्यांनी अनेक चित्रपटांमध्ये दमदार अभिनय केला आहे. रितिक रोशन, अजय देवगन अशा अनेक कलाकारांबरोबर त्यांनी स्क्रीन शेअर केली होती. त्यांच्या अभिनयाचे नेहमीच सगळीकडे कौतुक होत असायचे. सुरुवातीला मिथिलेश चतुर्वेदी यांनी शासकीय क्षेत्रात नोकरी केली. मात्र त्यांना अभिनयाची आवड असल्याने त्यांनी अभिनय क्षेत्रात देखील नशीब आजमवायाला सुरुवात केली.
काही दिवसांपूर्वी रमेश देव यांचे देखील निधन झाले. रमेश देवी यांनी आंधळा मागतो एक डोळा, देवघर, साता जन्माची सोबती, पैशाचा पाऊस, भाग्यलक्ष्मी, आरती अशा प्रसिद्ध चित्रपटांमध्ये काम केले आहे. वृद्धापकाळाने त्यांनी देखील मृत्यूला कवटाळले. त्यांच्या निधनाने संपूर्ण महाराष्ट्रात शोकाकुल वातावरण पसरले होते.
अशात आता आपल्या सुरांनी सर्वांना मंत्रमुग्ध करणाऱ्या एका प्रसिद्ध गायिकेचे देखील निधन झाले आहे. या गायिकेने आतापर्यंत हिंदी, तमिळ, बंगाली भाषांमध्ये गाणी गायली आहेत. निर्मला मिश्रा यांचे नुकतेच निधन झाले आहे. वयाच्या 81 व्या वर्षी त्यांनी या जगाचा निरोप घेतला. त्यांनी अनेक चित्रपटांसाठी तसेच मालिकांच्या टायटल सॉंग साठी देखील गाणे गायले आहे. त्यांच्या गाण्यांमुळे त्यांचे लाखो चाहते आहेत. निर्मला यांचा आवाज कानी पडतात अनेक जण मंत्रमुग्ध व्हायचे.
निर्मला यांनी शेवटच्या क्षणापर्यंत गाणे गायले आहे. त्यांच्या निधनाच्या दोन दिवसांपूर्वी त्यांना अस्वस्थ वाटत होते. अशात त्यांना चक्कर देखील आली त्यामुळे कुटुंबीयांनी त्यांना एका रुग्णालयात दाखल केले. रुग्णालयात गेल्यानंतर समजले की त्यांना हृदयविकाराचा झटका आला होता. यातच त्यांचे निधन झाले आहे.
निर्मला यांना लहानपणापासूनच गाण्याची आवड होती. मात्र कुटुंबामध्ये कोणीही संगीत विश्वात सक्रिय नव्हते. त्यामुळे सुरुवातीला त्यांना आपली ओळख निर्माण करण्यासाठी खूप मेहनत घ्यावी लागली. त्यांनी घेतलेल्या परिश्रमांमुळेच त्या एवढ्या मोठ्या प्रसिद्ध गायिका होऊ शकल्या.