चित्रपटसृष्टी हादरली! प्रसिध्द अभिनेत्याचे निधन; 100हून अधिक चित्रपटात साकारली होती भूमिका

नवी दिल्ली | काही दिवसांपूर्वी इंडियन कॉमेडियन राजू श्रीवास्तव यांचं हृदयविकारानं निधन झालं. गेली दोन वर्षे चित्रपट सृष्टीत तसेच रंगमंचावर काम करणाऱ्या अभिनेत्यांचे निधन होताना दिसतय. अशाच एका ज्येष्ठ अभिनेत्याचं निधन झालंय. निधन होण्याचं कारण काय हे अजूनही स्पष्ट झालं नाहीये.

Join WhatsApp Group

 

काही वर्षांपूर्वी आलेला ‘ब्लॅक फ्रायडे’ ते ‘इंडियाज मोस्ट वॉन्टेड’ यासारख्या अनेक चित्रपटांमध्ये काम करत अभिनयाची छाप सोडणारे अभिनेते जितेंद्र शास्त्री यांचे निधन झालय.

 

एक दमदार अभिनेते अशी त्यांची ओळख होती. त्यांनी अनेक चित्रपटांमध्ये छोट्याशाच पण संस्मरणीय भूमिका साकारल्या आहेत. जितेंद्र यांनी नॅशनल स्कूल ऑफ ड्रामामधून अभिनयाचे धडे घेतले होते, ते नाट्य क्षेत्रात त्यांचे नाव विशेष लोकप्रिय होते.

 

या चित्रपटात केलं काम:
जितेंद्र यांनी ‘कैद-ए-हयात’, ‘सुंदरी’ यासांरख्या लोकप्रिय नाटकात काम केले आहे. त्यांच्या प्रसिद्ध अशा चित्रपटांच्या यादीत ‘ब्लॅक फ्रायडे’, ‘इंडियाज मोस्ट वॉन्टेड’, ‘लज्जा’, ‘चरस’ यांची नाव घेता येतील.

 

अभिनेते संजू मिश्रा यांनी सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत व्यक्त केला शोक – दरम्यान त्यांच्या निधनाची बातमी कळताच जितेंद्र यांचे सहकलाकार तसेच अभिनेते संजय मिश्रा यांनीही त्यांच्या निधनावर शोक व्यक्त केला आहे. संजय मिश्रा यांनी त्यांच्या ट्विटर हँडलवरून जितेंद्र शास्त्री यांच्यासोबतचा एक जुना व्हिडिओ शेअर केला.

 

लिहिले की, ‘जीतू भाई, तुम्ही असता तर तुम्ही असे काहीतरी बोलले असतात, ‘मिश्रा काय वेळ आहे, मोबाईलमध्ये नावच राहत आणि व्यक्ती मात्र नेटवर्कच्या बाहेर गेली असती. तुम्ही आता या जगात नाहीत मात्र नेहमी माझ्या हृदयाच्या आणि मनाच्या जवळ राहाल.अशी भावना शेअर केले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button