चित्रपटसृष्टी हादरली! प्रसिध्द अभिनेत्याचे निधन; चित्रपट सृष्टीत शोककळा

मुंबई | काहीच वर्षांपूर्वी आलेला ‘ब्लॅक फ्रायडे’ ते ‘इंडियाज मोस्ट वॉन्टेड’ यासारख्या अनेक चित्रपटांमध्ये काम करत अभिनयाची छाप सोडणारे अभिनेते जितेंद्र शास्त्री (Jeetendra Shastri Death) यांचे निधन झाले.
काही दिवसापूर्वीच बॉलिवूडमधील प्रसिद्ध कॉमेडियन राजू श्रीवास्तव यांचे निधन झाल्याने बॉलिवूड शोक व्यक्त करत होते. राजू श्रीवास्तव यांच्या निधनाच्या धक्क्यातून बाहेर निघत नाही तो पर्यंत बॉलीवूडला हादरवणारी आणखी एक बातमी समोर आल्याने बॉलीवूडला नजर लागल्याचे अनेकांनी म्हणले आहे.
हिंदी नाट्यक्षेत्रात अभिनेते जितेंद्र यांना जीतू भाई म्हणून ओळखले जायचे. एक दमदार अभिनेते अशी त्यांची ओळख होती. त्यांनी अनेक चित्रपटांमध्ये छोट्याशाच पण संस्मरणीय भूमिका साकारल्या आहेत. जितेंद्र यांनी नॅशनल स्कूल ऑफ ड्रामामधून अभिनयाचे धडे घेतले होते, ते नाट्य क्षेत्रात त्यांचे नाव विशेष लोकप्रिय होते.
जितेंद्र यांनी ‘कैद-ए-हयात’, ‘सुंदरी’ यासांरख्या लोकप्रिय नाटकात काम केले आहे. त्यांच्या प्रसिद्ध अशा चित्रपटांच्या यादीत ‘ब्लॅक फ्रायडे’, ‘इंडियाज मोस्ट वॉन्टेड’, ‘लज्जा’, ‘चरस’ यांची नाव घेता येतील.
संजय मिश्रा यांनी वाहिली आदरांजली:
जितेंद्र यांना श्रद्धांजली वाहणारी पोस्ट त्यांचे जवळचे मित्र आणि सहकालाकार संजय मिश्रा यांनी शेअर केली आहे.
काय लिहलय पोस्टमध्ये:
तू भाई तुम्ही असता तर असं काही म्हणाला असता- मिश्रा कधीकधी काही होतं ना की, मोबाइलमध्ये नाव राहून जात आणि माणूस नेटवर्कबाहेर जातो. तुम्ही या जगातून निघून गेले आहात पण तुम्ही आमच्या मनाच्या आणि हृदयाच्या नेटवर्कमध्ये कायम राहाल.’