आत्ताच्या घडामोडी

चित्रपटसृष्टी हादरली! ‘भाभीजी घर पर हैं’ मधील प्रसिध्द अभिनेत्याचे निधन; ४२व्या वर्षी घेतला जगाचा निरोप

मुंबई | गेल्या काही दिवसांपासून अभिनय क्षेत्रातील अनेक दिग्गज कलाकार जगाचा निरोप घेत आहेत. २०२२ या वर्षात अनेकांनी जगाचा निरोप घेतला आहे. त्यामुळे अभिनय क्षेत्रात शोककळा पसरली आहे. लता मंगेशकर, बप्पी लहरी

केके, रमेश देव, सिद्धू मुसेवाला या सारख्या दिग्गजांनी जगाचा निरोप घेतला आहे. लता मंगेशकर यांच्या निधनाला अनेक महिने होऊन गेले मात्र त्यांना अजून देखील चाहते विसरू शकले नाहीत. त्यांच्या आठवणीत अनेक चाहते सध्या आहेत.

 

अभिनय क्षेत्राला कोणाची नजर तर लागली नाही ना? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. अशीच एक अजून धक्कादायक माहिती समोर आली आहे. भाभिजी घर पर है या मालिकेत मुख्य रोल करणारे अभिनेते दिपेश भान यांचं निधन झाले आहे. त्यामुळे अभिनय क्षेत्रात शोककळा पसरली आहे.

 

दिपेश भान यांनी बराच काळ छोट्या पडद्यावर काम केले आहे. त्यांनी कॉमेडी कार्यक्रमात देखील भूमिका साकारली आहे. दिपेश यांनी भाभिजी घरपर हैं या मालिकेत मलखान सिंग यांची भूमिका साकारली आहे. ही मालिका अल्पावधीत घराघरात पोहोचली होती.

 

दिपेश हे मैदानात क्रिकेट खेळत असताना अचानक ते पडले, त्यानंतर त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र अखेर त्यांचा मृत्यू झाला आहे. त्यांना मानणारा चाहता वर्ग देखील मोठा होता. ते सोशल मीडियावर देखील कायम सक्रिय राहायचे.

 

त्यांच्या निधनाची बातमी समोर आल्यावर अनेक दिग्गजांनी त्यांना श्रद्धांजली अर्पण केली आहे. त्यांच्यावर अंतिम संस्कार देखील करण्यात आले आहेत. एक चांगला अभिनेता गमविल्याचे कायम राहील, असे शब्द दिग्गजांच्या तोंडातून निघू लागले आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button