चित्रपटसृष्टी हादरली! राजू श्रीवास्तव यांच्या नंतर आणखी एका विनोदी कलाकाराचे निधन; अभिनय क्षेत्रात शोककळा

मुंबई | गेल्या काही दिवसांपासून अभिनय क्षेत्रातील अनेक दिग्गज मान्यवर या जगाचा निरोप घेत आहेत. 2021 आणि 2022 या दोन वर्षात तर अनेक दिग्गज आपल्याला सोडून गेले आहेत. यात संगीत विश्वातील देखील अनेक मान्यवर आहेत. लता मंगेशकर, बप्पी लहरी, रमेश देव, केके, सिद्धू मुसेवाला आणि आत्ताच निधन झालेले राजू श्रीवास्तव.

Join WhatsApp Group

 

यांच्या सारख्या अनेक दिग्गजांनी या जगाचा निरोप घेतला आहे. त्यामुळे अभिनय क्षेत्राला कोणाची नजर तर लागली नाही ना? असा थेट सवाल व्यक्त केला जात आहे. राजू श्रीवास्तव यांच्या नंतर आत्ता आणखी एका दिग्गज विनोदी कलाकाराचे निधन झाले आहे. त्यामुळे पुन्हा एकदा अभिनय क्षेत्रात शोककळा पसरली आहे. गेल्या काही दिवसांपूर्वी राजू श्रीवास्तव यांनी जगाचा निरोप घेतला.

 

त्यांच्या निधनाची बातमी ताजी असताना आणखी एका दिग्गजाने या जगाचा निरोप घेतला आहे. जिम मध्ये व्यायाम करत असताना राजू यांना हृदयविकाराचा झटका आला आणि त्यात त्यांना तात्काळ रूग्णालयात दाखल करण्यात आले. अनेक दिवस त्यांना रूग्णालयात ठेऊन देखील त्यांच्या प्रकृतीत सुधारणा आली नाही.

 

आणि अखेर त्यांनी या जगाचा निरोप घेतला आहे. मात्र राजू यांच्या एका अत्यंत जवळच्या सहकाऱ्याचे निधन झाले आहे. याबाबत सुनील पाल याने याबाबत माहिती दिली आहे. सुनील ने भावून होऊन एक व्हिडिओ Instagram वर शेअर केला आहे. त्यात तो म्हणाला आहे की, नमस्कार मित्रांनो आमचे मित्र, आमचे द लाफ्टर चॅलेंज मधील पार्टनर पराग कंसार जी आज आम्हाला सोडून गेले आहेत.

 

ते आम्हाला नेहमी हसवायचे पण आता ते या जगात नाहीत. अशा भावून शब्दात त्यांनी व्हिडिओ बनवून शेअर केला आहे. पराग कंसार हे एक कॉमेडी अभिनेते होते. गेल्या काही दिवसांपासून ते अभिनय क्षेत्रापासून दूर होते. मात्र काही काळी त्यांनी अभिनय क्षेत्रात चांगलाच जम बसविला होता.

 

पराग हे कॉमेडी का किंग कोन आणि द लाफ्टर चॅलेंज या मुख्य शो मध्ये दिसले होते. ते राजू श्रीवास्तव यांचे सहकारी होते. त्यांनी त्यांच्या सोबत काम केले आहे. पराग यांच्या निधनाने अभिनय क्षेत्रात शोक व्यक्त केला जात आहे. अनेक दिग्गज लोकांनी त्यांना श्रद्धांजली अर्पण केली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button