चित्रपटसृष्टी हादरली! 29 वर्षीय प्रसिध्द अभिनेत्रीची गळफास घेऊन आत्महत्या; १००हून अधिक चित्रपटात साकारली होती भूमिका

चेन्नई | गेल्या काही दिवसांपासून अनेक दिग्गज कलाकार या जगाचा निरोप घेत आहेत. अनेक जणांच्या निधनाने अभिनय क्षेत्राला कोणाची नजर तर लागली नाही ना? असा थेट सवाल व्यक्त केला जात आहे. गेल्या दोन ते तीन वर्षांपासून अनेक कलाकार या जगाला सोडून गेले आहेत. यात अनेक दिग्गजांच्या नावांचा समावेश आहे.

Join WhatsApp Group

 

गेल्या दोन वर्षांपूर्वी प्रसिध्द अभिनेता सुशांत सिंग राजपूत याने आत्महत्या केली होती. त्याचीच पुनावृत्ती झाली आहे. एका प्रसिध्द अभिनेत्रीने आत्महत्या केल्याने अभिनय क्षेत्रात खळबळ उडाली आहे. सुशांत सिंग याने आत्महत्या केल्यानंतर देशात शोक व्यक्त करण्यात आला होता. एवढंच नव्हे तर पूर्ण बॉलीवुड शोक सागरात पडले होते.

 

डिप्रेशन मध्ये येऊन सुशांत याने आत्महत्या केली आणि जाता जाता पूर्ण जगाला तो रडवून गेला आहे. आज देखील अशाच एका प्रसिध्द अभिनेत्रीने आत्महत्या केली आहे. त्यामुळे अभिनय क्षेत्रात खळबळ उडाली आहे. कलाकारांच्या आत्महत्यांच्या प्रमाणात वाढ होत आहे. नेमके कलाकारांसोबत असे का घडते असा प्रश्न चाहत्यांना पडला आहे.

 

हिंदी, तेलगू, कन्नड आणि मल्याळम या भाषांमधील चित्रपटात काम करून करोडो चाहत्यांच्या मनावर राज्य करणारी अभिनेत्री दीपाने चेन्नई मधील एका फ्लॅट मध्ये आत्महत्या केली आहे. गेल्या अनेक दिवसांपासून ती डिप्रेशन मध्ये होती. तिच्यावर तणावाचे वातावरण होते. हे सर्वांना स्पष्ट दिसत होते.

 

तिच्या नातेवाईकांनी गेल्या काही दिवसांपासून तिला कॉल वर संपर्क करण्याचा प्रयत्न देखील केला. मात्र तिने त्यांना म्हणावा असा रिस्पॉन्स दिला नाही. आणि अखेर तिने गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. तिने १००हून अधिक चित्रपटात काम करून करोडो चाहत्यांच्या मनावर राज्य केलं आहे. दीपा ही सोशल मीडियावर कायम चर्चेत राहणारी अभिनेत्री होती.

 

तिचे अनेक चित्रपट बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालून गेले आहेत. तिने आत्महत्या केल्यानंतर सदर घटना पोलिसांना कळविण्यात आली, पोलिसांनी तपास सुरू केला आहे. मात्र मिळालेल्या माहिती नुसार सदर अभिनेत्रीला प्रेमात अपयश आल्याने तिने टोकाचं पाऊल उचललं आहे. असे सांगितले जात आहे. पोलीस पुढील तपास करत आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button