वडिलांचं निधन.. आईला शेतात हातभार..आज upsc मध्ये….

उत्तर प्रदेश | उत्तर प्रदेशतील मुरादाबाद येथील कुंडरकी गावातील इल्मा अफरोजने वयाच्या 14 व्या वर्षांपासून मेहनत केली आहे. लहानपणी वडिलांचं जाणं हे तिच्यासाठी खूप काही शिकवून गेलं. तेव्हापासून ती आपल्या आईला शेतात काम करून आपला उदरनिर्वाह करत होती.

 

Advertisement

मुरादाबाद ते दिल्ली, इल्माचा शैक्षणिक संघर्ष:
मुरादाबाद येथून शालेय शिक्षण पूर्ण केल्यानंतर इल्मा अफरोजने सेंट स्टीफन्स, दिल्ली येथे प्रवेश घेतला. तेथून तिने तत्त्वज्ञानात पदवीचे शिक्षण घेतले. इल्मा सेंट स्टीफनमध्ये घालवलेल्या वर्षांना तिच्या आयुष्यातील सर्वोत्तम काळ मानते, जिथे तिला खूप काही शिकायला मिळाले. तिच्या मेहनतीमुळे तिला ऑक्सफर्ड विद्यापीठाची शिष्यवृत्ती मिळाली आणि तेथून तिने पदव्युत्तर शिक्षण घेतले.

 

Advertisement

परदेशात जाण्यासाठी इल्माकडे तिकीटाचे पैसे नव्हते, मग गावातील चौधरी दादांची मदत घेतली. तिला ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटीत शिष्यवृत्ती मिळाली होती. पण बाकीच्या खर्चासाठी ती शिकवणी शिकवायची आणि मुलांची काळजी घ्यायची. दरम्यान, तिच्या आईला गावकरी सांगू लागले की, ती आता परदेशात राहणार आहे आणि भारतात परतणार नाही.

 

पदवीनंतर इल्मा अफरोज एका स्वयंसेवक कार्यक्रमात सामील होण्यासाठी न्यूयॉर्कला गेली. त्याठिकाणी तिला फायनान्शिअल इस्टेट कंपनीत उत्तम नोकरीची सुवर्णसंधी मिळाली होती.

शिमल्यात एसपी एसडीआररफ म्हणून तैनात:
आपले शिक्षण हा आपल्या आईचा आणि देशाचा हक्क मानते. त्यामुळेच भारतात आल्यानंतर तिने यूपीएससी परीक्षेची तयारी सुरू केली. 2017 मध्ये इल्माने नागरी सेवा परीक्षेत 217 वा क्रमांक मिळवला होता. तेव्हा तिचे वय 26 वर्षे होते. सध्या ती शिमल्यात एसपी एसडीआरएफ म्हणून तैनात आहेत.

 

इल्माची जमिनीशी असलेली नाळ:
जमिनीशी जोडलेले रहा आणि आपल्या ध्येयावर लक्ष्य केंद्रित करा. इल्माने आपले यश कधीही डोक्यावर जाऊ दिले नाही. तसेच या यशाच्या वाटेवर भेटलेल्या लोकांचे सहकार्यही ती विसरली नाही. उलट या संघर्षात तिचे सोबती बनलेल्या प्रत्येकाचे आभार मानले

पूर्ण बातमी वाचा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *