वडील ट्रक चालक, झोपडीत कंदिलाच्या उजेडात अभ्यास करून तरुण बनला IAS अधिकारी; वाचून डोळ्यात पाणी येईल

दिल्ली | हिंदीमध्ये अशी म्हण आहे की, “भगवान के घर देर है अंधेर नहीं.” याचीच प्रचिती राजस्थानमधील एका ट्रक ड्रायव्हरच्या मुलाला आली आहे. वडील ट्रक ड्रायव्हर असून त्यांच्या मुलाने अथक परिश्रम करून upsc ही परीक्षा उत्तीर्ण केली आहे. तसेच आता त्याने आयएएस हे पद देखील मिळवले आहे. त्याच्या या विजयाने त्याच्या वडिलांची मान अभिमानाने उंचावली आहे. सर्वत्र या विजयाचे कौतुक होताना दिसते आहे.
नगौर जिल्ह्यातील सोमना येथील पवनकुमार कुमावत यांनी हा विजय मिळवला आहे. देशभरातून त्यांनी ५५१ वा क्रमांक मिळवला आहे. आपले वडील एक ट्रक चालक आहेत त्यामुळे त्यांनी आपल्यासाठी घेतलेली मेहनत पवन यांनी जवळून पाहिली आहे. पवन यांच्या वडिलांचे नाव रामेश्वर लाल असे आहे. त्यांनी आपल्या मुलाच्या शिक्षणासाठी खूप मेहनत घेतली. रामेश्वर लाल हे ट्रक चालवण्याआधी गावातच मातीची भांडी बनवत होते. त्यातून ते आपला उदरनर्वाह करत होते.
पवनचे शालेय शिक्षण पूर्ण झाल्यावर पुढील शिक्षणासाठी त्यांना अधिक पैसे पाहिजे होतें. मात्र फक्त मातीच्या भांड्यावर शिक्षण पूर्ण होणे कठीण होते. त्यामुळे त्यांच्या बाबांनी ट्रक चालवण्याचा निर्णय घेतला. पवन यांनी एका मुलाखतीत सांगितले होते की,” मी एकदा वर्तमापत्रात वाचले होते की, रिक्षा चालकाचा मुलगा आयएएस अधिकारी झाला. त्यावेळीच मी सुधा आयएएस होण्याचे ठरवले. माझ्या यशामध्ये माझ्या बाबांनी मला खूप मदत केली. त्यांच्या मुळेच मी आज एव्हढे मोठे यश मिळवू शकलो आहे.
पवन यांची आर्थिक परिस्थिती खूप गरिबीची होती. त्यांनी खूप हालाकीत आपले जीवन काढले आहे. मात्र त्यांनी कधीच हार मानलेली नाही. त्यांनी शेवटपर्यंत मेहनत घेतली आणि आपल्या परिस्थितीवर मात करून यशाचा झेंडा रोवला. त्यांच्या विजयामुळे आज कुटुंबीयातील आणि त्यांच्या गावातील सर्वांनाच मोठा आनंद झाला आहे.
त्यांना राहायला पुरेसे घर देखील नव्हते ते एका झोपडीत राहत होते. त्यांच्याकडे वीज देखील नव्हती. रात्रीच्या वेळी अभ्यासासाठी दुसऱ्याच्या घरातून त्यांचे बाबा विजेची लाईन घेत होते. तसेच कधी कधी रात्रीच्या वेळी अभ्यास करण्यासाठी ते किंवा दिवा यातील आगीच्या उजेडात अभ्यास करायचे. मात्र आता त्यांच्या या संघर्षाचे चीज झाले आहे.