Farmer Yojana: तुमच्या शेतातून वीज लाईन गेली असेल तर मिळेल भाडे; लगेच करा अर्ज

Farmer Yojana | नमस्कार शेतकरी बंधूंनो आज आपण अशा एका योजने बाबत माहिती घेणार आहोत. ज्या योजनेचा तुम्हाला खूप फायदा होणार आहे. जर तुमच्या शेतातून महावितरणची वीज वाहतूक करणारी लाईन गेली असेल तर तुम्हाला त्याचा मोबदला मिळणार आहे. तो कसा मिळवायचा याबाबत आम्ही या लेखात माहिती देणार आहे. त्यासाठी तुम्ही हा पूर्ण लेख वाचा. (Shetatun Line geli asel tar milel bhade)

Join WhatsApp Group

 

अनेक शेतकऱ्यांच्या शेतातून वीज वाहतूक करणारी लाईन गेलेली असते. आणि शेतात पोल किंवा टॉवर असतात, त्यामुळे ज्या ठीकणी पोल आहे. ती जागा नापीक होऊन जाते. यात शेतकऱ्याला मोठ नुकसान सहन करावं लागते. आज आम्ही या संदर्भातील एका योजने बाबत माहिती देणार आहोत. जर तुमच्या शेतातून वीज वाहतूक करणारी मोठी लाईन गेली असेल तर तुम्हाला तुमच्या जागेचे भाडे मिळणार आहे.

 

किती मोबदला मिळणार?
टॉवर किंवा पोलने व्यापलेली जमीन जर कोरडवाहू असेल तर त्या जागेच्या शेत्रफळाच्या नुसार सरकारी भाव निश्चित केल्या नुसार २५% तुम्हाला मोबदला मिळू शकतो. जर तुमची जमीन बागायती असेल तर तुम्हाला ६०% पर्यंत मोबदला मिळू शकतो.

 

असा करा अर्ज?
तुमच्या शेतातून जर टॉवर किंवा मोठी वीज वाहतूक करणारी लाईन जात असेल तर त्यापूर्वी काही दिवस तुम्हाला नोटीस दिले जाते. नोटीस मिळाल्यानंतर तुम्ही अर्ज करू शकता. मात्र जर तुमच्या शेतात पूर्वी पासून वीज वाहतूक करणारी लाईन गेली असेल तर याबाबत तुम्ही तुमच्या जवळच्या महापारेषण मध्ये जाऊन अर्ज करू शकता.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button