प्रसिद्ध डॉक्टरांच्या मुलीची आत्महत्या, कारण वाचून डोळ्यात पाणी येईल

मुंबई | गेल्या काही महिन्यांपासून वेगवेगळ्या ठिकाणच्या तरुण गटातील मुलामुलींचे आत्महत्या करण्याचे प्रमाण वाढले आहे. अशातच एका डॉकटर मुलीने आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे.कोल्हापुर मुलीने स्वतः भुलीचे इंजेक्शन घेऊन आत्महत्या केली आहे. सामान्य जनतेचा जीव वाचवणाऱ्या एका डॉक्टर तरुणीच्या मृत्यूमुळे परिसरात खळबळ उडाली आहे.आत्महत्या केलेल्या तरुणीचे नाव अपूर्वा हेंद्र असे असून ती प्रसिद्ध डॉक्टर प्रवीणचंद्र हेंद्रे याची मुलगी आहे. ताराबाई पार्क येथील डी मार्टच्या समोर अपूर्वा ही बेशुध्द अवस्थेत सापडली होती.
तिला उपचारासाठी हॉस्पिटल मध्ये घेऊन गेल्यानंतर उपचारादरम्यान तिचे निधन झाले. शनिवारी रात्री तिच्या मित्रांसोबत पार्टी करून ती घरी आली होती. पहाटेच्या वेळी ती राहत्या घरातून कोणाला न सांगता बाहेर पडली. सकाळी अपूर्वा घरामध्ये दिसत नसल्याने तिच्या वडिलांनी शाहूपुरी पोलिस स्टेशन मध्ये धाव घेतली. तेव्हा शहापूर पोलीस स्टेशन मधील पोलिसांना मिळालेल्या माहितीनुसार पोलीस प्रवीणचंद्र यांना घेऊन घटनास्थळी पोहोचले.
परंतु अपूर्वा ही बेशुद्धावस्थेमध्ये रस्त्याच्या बाजूला पडलेली आढळून आली. त्याच बरोबर तिच्या शेजारी विरेनियम इंजेक्शनची बाटली आणि सिरींज तपासामध्ये आढळून आली. त्यामुळे या इंजेक्शनचे जास्त प्रमाण घेऊन अपूर्वा ने जीवन संपवल् असल्याचा प्राथमिक अंदाज तपास करत असणाऱ्या पोलिसांनी व्यक्त केला आहे.
परंतु अपूर्वा ने आत्महत्ये करून टोकाचं भयंकर पाऊल उचलण्यामागील नेमकं काय कारणं आहे, याचा पोलीस तपास अजून करीत आहेत. या घटनेमुळे हेंद्रे डॉक्टर परिवारावर दुःखाचा डोंगर पसरला आहे. तरुण डॉक्टर मुलीने आत्महत्या केल्यामुळे परिसरातील नागरिकां मधून हळहळ व्यक्त केली जात आहे.