आत्ताच्या घडामोडीक्रिकेट

भारतीय क्रिकेट विश्वावर शोककळा! प्रसिध्द क्रिकेटरचे निधन

दिल्ली | क्रीडा विश्वातील एक दुःखद बातमी समोर येत आहे. एका अष्टपैलू खेळाडूचा मृत्यू झाला आहे. त्यांच्या निधनाने संपूर्ण क्रीडा विश्वात शोककळा पसरली आहे. अनेक व्यक्ती त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहत आहेत.

 

मध्य प्रदेश रणजी संघाचे माजी कर्णधार आणि अष्टपैलू खेळाडू अशोक जगदाळे यांनी सोमवारी या जगाचा निरोप घेतला. इंदौर येथील एका खासगी रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू होते. मात्र हे उपचार अयशस्वी ठरले आणि त्यांची प्राण ज्योत मालवली.

 

वयाच्या ७६ व्या वर्षी त्यांनी या जगाचा निरोप घेतला आहे. त्यांचे भाऊ संजय जगदाळे यांनी अशोक यांच्या निधनाची माहिती दिली. त्यांनी सांगितले की, ” रविवारी रात्री आम्ही सगळे एकत्र होतो तेव्हा माझ्या मोठ्या भावाच्या नाकातून अचानक रक्तस्त्राव होऊ लगला. त्यामुळे आम्ही त्याला तातडीने एका खासगी रुग्णालयात भरती केले. रक्त स्त्राव अधिक होता त्यामुळे डॉक्टरांनी त्याला वाचवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले. मात्र यात त्याचा मृत्यू झाला.”

 

संजय जगदाळे भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे माजी सचिव आहेत. आपल्या भावाच्या निधनाने ते खूप दुःखी आहेत. अशोक यांच्या निधनाची माहिती समजताच अनेकांनी सोशल मीडियावर शोक व्यक्त केला आहे. क्रिकेट इतिहास तज्ञ सूर्यप्रकाश चतुर्वेदी त्यांनी देखील शोक व्यक्त करत लिहिले की, ” जगदाळे हे मध्य प्रदेशातील उत्कृष्ट अष्टपैलू क्रिकेटपटूंपैकी एक होते. त्यांनी मध्यमगती गोलंदाज म्हणून राज्य संघासाठी विशेष कामगिरी केली आहे. आधी ते उजव्या हाताने फिरकी चेंडू टाकायचे. नंतर त्यांनी डाव्या हाताने देखील ही कला अवगत केली.”

 

मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान आणि केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया यांच्यासह अनेक चाहते आणि क्रिकेट प्रेमींनी त्यांच्या निधनामुळे शोक व्यक्त केला आहे. अशोक जगदाळे यांनी 76 प्रथम श्रेणी सामन्यात चार शतकांसह 2,954 धावा केल्या आणि 182 विकेट घेतल्या होत्या. त्यांचा खेळ नेहमीच कौतुकास्पद राहिला आहे. आता त्यांच्या निधनाने क्रिकेट विश्वातील कधीही भरून न निघणारी पोकळी तयार झाली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button