प्रसिद्ध क्रिकेटपटूच निधन; मृत्युआधी जगत होते हलकी जीवन

नवी दिल्ली | माजी पाकिस्तानी पंच असद रौफ यांचे बुधवारी निधन झाले. लाहोरमध्ये त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्याचा भाऊ ताहिर रौफने सांगितले की, असद दुकान बंद करून घरी परतत असताना त्याला हृदयविकाराचा झटका आला आणि त्याचा मृत्यू झाला. असद रौफ हे 66 वर्षांचे होते. एकेकाळी आयसीसीच्या एलिट पॅनलमध्येही त्यांचा समावेश होता.

Join WhatsApp Group

 

असद रौफचा 2006 मध्ये ICC च्या एलिट अंपायर पॅनलमध्ये समावेश करण्यात आला होता. 2013 पर्यंत ते या पॅनलमध्ये राहिले. त्याने आंतरराष्ट्रीय स्तरावर 64 कसोटी, 28 टी-20 आणि 139 एकदिवसीय सामने खेळले. 2013 साली आयपीएल स्पॉट फिक्सिंगमध्ये त्याचे नाव आल्यानंतर त्याची कारकीर्द संपुष्टात आली.

 

लाहोरमध्ये बूट-कपड्यांचे दुकान चालवणाऱ्या
रौफवर 2013 मध्ये स्पॉट फिक्सिंगचा आरोप झाल्यानंतर त्याने ताबडतोब भारत सोडला. या आरोपांनंतर आयसीसीने त्याला आंतरराष्ट्रीय अंपायर पॅनलमधूनही वगळले. यानंतर बीसीसीआयने तीन वर्षांनी त्याला या प्रकरणात दोषी ठरवले आणि 2016 मध्ये त्याच्यावर 5 वर्षांची बंदी घातली. यानंतर रौफने लाहोरमध्ये बूट-कपड्यांचे दुकान उघडले. गेल्या अनेक वर्षांपासून ते या व्यवसायातून घर खर्च चालवत होते.

 

तपास समितीने असद रौफलाही दोषी ठरवले होते. यानंतर बीसीसीआयने 2016 मध्ये त्याच्यावर पाच वर्षांची बंदी घातली होती. सट्टेबाजांकडून महागड्या भेटवस्तू घेतल्याचा आरोप त्याच्यावर होता. यावर तो म्हणाला, “या सर्व समस्या येईपर्यंत आयपीएलमध्ये मी माझा सर्वोत्तम वेळ दिला होता.” सट्टेबाजांकडून महागड्या भेटवस्तू घेतल्याच्या आरोपावर रौफ म्हणाले, “माझा त्यांच्याशी काहीही संबंध नव्हता.”

 

असद रौफ यांच्या आकस्मिक निधनाने सर्वांनाच धक्का बसला आहे. सोशल मीडियाच्या माध्यमातून लोक त्याच्याबद्दलच्या भावना व्यक्त करत आहेत. इतकंच नाही तर रौफचे चाहतेही त्याच्या कुटुंबाप्रती शोक व्यक्त करत आहेत आणि त्याच्या कुटुंबाचं सांत्वन करत आहेत.

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button